या व्यावस्थे त जर निवडणूक पार पडली गेली तर कोणी सवाल राहणार नाही सारेच काही ठीक ठाक होईल !

IMG-20180522-WA0086

प्रतिनिधी.

आत्ता येणा-या निवडणुकिमध्ये व्हीव्ही पॅट (VVPAT – voter verifiable paper audit trail) हे मशिन वाढवण्यात आले आहे.
हे मशिन मतदाराने मत द्यायच्या टेबलवरच उपलब्ध असणार आहे.

मतदाराने मत देताच त्याने ज्या उमेदवारास मत दिले त्याचा अनुक्रमांक,नाव व त्याचे चिन्ह या मशिनमध्ये कागदावर प्रिंट होऊन ७ सेकंदासाठी दिसणार आहे
व त्यानंतर त्या कागदाची स्लीप मशिनद्वारे कापली जाऊन त्याच्या खाली असणा-या सिलबंद पेटिमध्ये साठवली जाणार आहे.

मतदानाच्या वेळेस जर एखाद्या उमेदवाराने एखाड्या केंद्राच्या बाबतीत आक्षेप नोंदवल्यास विहित प्रक्रिया पूर्ण करून मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी त्या केंद्राच्या उमेदवार/प्रतिनिधी समक्ष व्हीव्ही पॅट (VVPAT – voter verifiable paper audit trail) मध्ये आक्षेप घेणाऱ्यास पुन्हा मत देण्यास सांगून खातरजमा करणार.

तसेच मतदान अधिकारी, उमेदवारांचे प्रतिनिधी व अाक्षेप घेणारा मतदार हे पुन्हा एकदा मतदान करून पाहतील व तथ्य आढळल्यास मतदान प्रक्रिया बंद केली जाईल.
पण मतदार खोटे बोलत असल्यास रु. १००० दंड व ६ महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते .

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT