यापुढे कोण , का आणि कैसे पाठवू इच्छितो भाजप सेना सरकार ला सम्पावर ? क़ाय प्रकरण आहे ते जाणून घ्या !

IMG-20171128-WA0055

प्रतिनिधि.

राज्यातील शेतकरी आत्महत्या करतोय, शेतकरी संपावर जातोय ,व्यापारी, अंगणवाडी सेविका आणि शिक्षक संपावर जात आहेत !

त्यामुळे या सरकारवर हल्लाबोल करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजप-सेनेच्या सरकारला आता कायम स्वरुपी संपावर पाठवणार असल्याची घणाघाती टिका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी औरंगाबाद येथे केली!
औरंगाबाद मध्ये विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वा खाली हल्लाबोल आंदोलन करण्यात आले !

यावेळी धनंजय मुंडे यांनी सरकारवर जोरदार टिका केली.
धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणा मध्ये महाराष्ट्रातील आणि केंद्रातील सरकार ज्या पध्दतीने आश्वासनांच्या जीवावर सरकार मध्ये आले.
परंतु साडेतीन वर्षात एकही आश्वासन भाजप-सेना सरकार पाळू शकलेले नाही.! म्हणून हे हल्लाबोल आंदोलन आहे !

शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी आहे, हे हल्लाबोल आंदोलन आहे.
या देशातील महागाई कमी करण्यासाठी आहे.
हे आंदोलन राज्यातील सर्वसामान्य माणूस ज्यापध्दतीने मागे जातोय !

त्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन आहे असे स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील सरकार बोलघेवडं आहे. कोणतीही विकासकामे या सरकारने केलेली नाही?

दोन लाख कोटींचे कर्ज वाढवलं, मी लाभार्थी, हे माझं सरकार या लाभार्थी मध्येसुध्दा या सरकारला एक लाभार्थी असा लाभार्थी मिळाला नाही!
पूर्वीच्या सरकारने जो फायदा दिला. तो लाभार्थी दाखवायचे !

जाहिरातबाजी करायची, संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला वेठीस धरण्याचे काम राज्यातील सरकार करतेय असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला!

या आंदोलनाला औरंगाबादमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार भाऊसाहेब चिखलगावकर, माजी आमदार किशोर पाटील,कैलास पाटील, अभय पाटील चिखलगावकर, शहराध्यक्ष काशीनाथ कोकाटे,माजी आमदार, पदाधिकारी,कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT