यशवंत चाँदवड़े यांच्या वर झालेला जीव घेणा हल्लेखोरा विरुद्ध केव्हा होईल कार्रवाही ?
प्रतिनिधि.
मी यशवंत चांदवडे राह.चिताळसर मानपाडा शिवाजी नगर स्मशान भूमी जवळ ठाणे 7 ठाणे महापौर सौ मिनाक्षी राजेंद्र शिंदे यांचा पती राजेंद्र किसन शिंदे व त्यांचा भाऊ विजय किसन शिंदे तसेच त्यांचे 30 ते40 साथीदार यांनी रात्री20/ 11/ 2017 रोजी12 : 00 वाजता माझ्या संपूर्ण घरावर प्राणघातक हल्ला केला.
त्या हल्ल्यात मी स्वतः व माझा मुलगा अंकुश चांदवडे याला जबर मार लागला असून तो सद्या ठाणे सिव्हिल रुग्णल्यात वैदयकीय उपचार घेत आहे .
तसेच माझी पत्नी नंदा चांदवडे ही सोडवण्यास गेली असता तिच्यावर सुद्धा बाबूंनी हल्ला केला.
ह्या प्रकारामुळे परिसरातील सर्व जण दहशतीखाली वावरत असून माझ्या व माझ्या घरातील सद्स्यांना जीवाला धोखा आहे.
ह्या सर्व प्रकरणात मला न्याय मिळावा तसेच आरोपींना योग्य ते कारवाही व्हावी .