मुख्यमंत्र्यां सोबतच्या विशेष बैठकीत, शिवसेनेतील मराठा मंत्र्यांनाही डावललं ना शिवसेनेला निमंत्रण ? काय प्रकरण ?

images (29)

मुंबई.

राज्यभर चिघळलेल्या मराठा आंदोलनाचा आढावा घेण्यासाठी, आणि हे आंदोलन कसं शांत करता येईल, याबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री वर्षा या आपल्या निवासस्थानी महत्त्वपूर्ण बैठक बोलवली आहे.

मुख्यमंत्र्यांनी या बैठकीला केवळ भाजपाच्या ज्येष्ठ मंत्र्यांना बोलवलं असून.

सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांना निमंत्रणच देण्यात आलेलं नाही.
त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना का डावललं अशी चर्चा सुरू झाली आहे.

मराठा आंदोलन एवढं पेटलं असताना ते शांत करण्यासाठी मंत्री मंडळातील सर्वांशी चर्चा करण्याची गरज असताना मुख्यमंत्र्यांनी केवळ भाजपाच्याच मंत्र्यांना बैठकीला बोलवल्यानं आश्चर्यव्यक्त केलं जातंय.

आधीच नाराज असलेली शिवसेना मुख्यमंत्र्याच्या या भूमिकेमुळे आणखी नाराज होण्याची शक्यता आहे !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT