मुंबई वाहतूक पोलिसांचे कर्तव्य लंडनपर्यंत कसे पोहोचले हे, पाहा सविस्तर बातमी !
प्रतिनिधी.
भोईवाडा वाहतूक पोलीस विभागात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई (बक्कल नं. 01153) दीपक नामदेव सांगळे यांनी केलेल्या उत्तम कर्तव्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांचे नाव लंडनमध्ये झळकले.
दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोशि दीपक सांगळे अमर सेल या पॉईंटवर कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी भारतात पर्यटनासाठी आलेल लंडनचे कुटुंबीय सांगळे यांच्याकडे आले.
आमचा 60 हजार रुपयांचा आयफोन टॅक्सीमध्ये विसरल्याचे सांगू लागले.
सांगळे व लंडनच्या कुटुंबीयांचे संभाषण अंकीत कोठारी नावाच्या मुलाने ऐकले.
त्याने आपल्या मोबाईलमध्ये ट्रॅकर अॅप्स डाऊनलोड केले आणि लंडनच्या इसमाचा मोबाईलचा शोध सुरू झाला.
सांगळे यांनी दुचाकीवर अंकीतला बसवले आणि मोबाईलचे लोकेशन जसे जसे दाखवते होते तसा पाठलाग करू लागले. नानाचौक येथील श्रीकृष्ण हॉटेलचे लोकेशन निदर्शनास आले.
नानाचौकाशी तीन – चार रस्ते जोडले गेल्यामुळे सांगळे लंडनच्या त्या इसमासोबत तेथेच थांबले.
सात – आठ टॅक्सी गेल्यावर लंडन कुटुंबीय प्रवास करत असलेली टॅक्सी तेथे आली.
लंडनच्या त्या इसमाने टॅक्सी चालकाला ओळखले आणि टॅक्सीत विसरलेला मोबाईल ताब्यात घेतला.
सदर घटनेप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात नोंद करून सदर मोबाईल भोईवाडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कुडपकर यांच्या समक्ष लंडनच्या नागरिकाला सुपूर्द करण्यात आला.
मोबाईल घेताना लंडनच्या कुटुंबीयाने टिपलेले फोटो लंडनमध्ये सर्वांना दाखवू, असे म्हणाले.
पोशि दीपक सांगळे यांच्या उत्तम कामगिरीमुळे मुंबई वाहतूक विभागाचे कर्तव्य लंडनपर्यंत पोहोचले.
या कर्तव्याबद्दल उपायुक्त अशोक दुधे यांनी पुष्पगुच्छ देऊन पोशि दीपक सांगळे यांचा गौरव केला. दीपक सांगळे यांच्या कर्तव्याला सलाम!
मुंबई वाहतूक पोलिसांचे कर्तव्य लंडनपर्यंत पोहोचले भोईवाडा वाहतूक पोलीस विभागात कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपाई (बक्कल नं. 01153) दीपक नामदेव सांगळे यांनी केलेल्या उत्तम कर्तव्यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांचे नाव लंडनमध्ये झळकले.
दि. 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास पोशि दीपक सांगळे अमर सेल या पॉईंटवर कर्तव्य बजावत होते.
त्यावेळी भारतात पर्यटनासाठी आलेल लंडनचे कुटुंबीय सांगळे यांच्याकडे आले.
आमचा 60 हजार रुपयांचा आयफोन टॅक्सीमध्ये विसरल्याचे सांगू लागले.
सांगळे व लंडनच्या कुटुंबीयांचे संभाषण अंकीत कोठारी नावाच्या मुलाने ऐकले.
त्याने आपल्या मोबाईलमध्ये ट्रॅकर अॅप्स डाऊनलोड केले आणि लंडनच्या इसमाचा मोबाईलचा शोध सुरू झाला.
सांगळे यांनी दुचाकीवर अंकीतला बसवले आणि मोबाईलचे लोकेशन जसे जसे दाखवते होते तसा पाठलाग करू लागले. नानाचौक येथील श्रीकृष्ण हॉटेलचे लोकेशन निदर्शनास आले.
नानाचौकाशी तीन – चार रस्ते जोडले गेल्यामुळे सांगळे लंडनच्या त्या इसमासोबत तेथेच थांबले.
सात – आठ टॅक्सी गेल्यावर लंडन कुटुंबीय प्रवास करत असलेली टॅक्सी तेथे आली. लंडनच्या त्या इसमाने टॅक्सी चालकाला ओळखले आणि टॅक्सीत विसरलेला मोबाईल ताब्यात घेतला.
सदर घटनेप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात नोंद करून सदर मोबाईल भोईवाडा वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक कुडपकर यांच्या समक्ष लंडनच्या नागरिकाला सुपूर्द करण्यात आला. मोबाईल घेताना लंडनच्या कुटुंबीयाने टिपलेले फोटो लंडनमध्ये सर्वांना दाखवू, असे म्हणाले.
पोशि. दीपक सांगळे यांच्या उत्तम कामगिरीमुळे मुंबई वाहतूक विभागाचे कर्तव्य लंडनपर्यंत पोहोचले.
या कर्तव्याबद्दल उपायुक्त अशोक दुधे यांनी पुष्पगुच्छ देऊन पोशि दीपक सांगळे यांचा गौरव केला.
दीपक सांगळे यांच्या कर्तव्याला सलाम!