मुंबई उच्च न्यायालय द्वारे क्रॉफर्ड मार्केट ला कड़क आदेश ?काय आहे खास अहवाल मधे पहा !
रिपोर्टर.
क्रॉफर्ड मार्केट येथे विविध प्रजातींच्या पाळीव प्राण्यांची विक्री तात्काळ बंद करा, असा कडक आदेश मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी दिला.
गेल्या अनेक वर्षांपासून क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्राणी आणि पक्षी विक्रीचा बेकायदेशीर धंदा करणारी अनेक दुकाने राजरोसपणे सुरू आहेत.
प्राण्यांच्या विक्रीला बंदी घालण्याच्या आणि विक्रेत्यांवर फौजदारी कारवाईच्या मागणीसाठी जनहित याचिका करण्यात आली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना पशू- पक्षांवर होणाऱ्या अत्याचार कायद्याअंतर्गत उच्च न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
तसेच हे आदेश देताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, ही दुकाने पुन्हा सुरू होणार नाहीत !
याची पालिका प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी काळजी घ्यावी.
कारवाईनंतर ही दुकाने पुन्हा सुरू झाली तर विभागातील संबंधित पालिका अधिकारी व स्थानिक पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम उच्च न्यायालयाने दिला आहे.