मंगळवेढा पोलीस ठाण्याला का आहे सक्षम अधिकारी ची आवश्यकता ?

download (35)

प्रतिनिधि.

महाराष्ट्र सोलापुर इथे मंगळवेढा पोलीस ठाण्यात सक्षम अधिकारी नसल्यामुळे अनेक गुन्ह्यांचा तपास रेंगाळत पडला आहे.

नागरिकांना न्याय मिळत नसल्यामुळे पिडीत व्यक्ती पोलीस ठाण्याचे उंबरठे झिजवत असल्याचे चित्र आहे?
दरम्यान, कर्तव्यदक्ष पोलीस अधिक्षक विरेश प्रभू यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याला सक्षम अधिकारी देवून येथील रेंगाळलेल्या गुन्ह्याच्या कामांना गती द्यावी अशी जनतेमधून अग्रक्रमाने मागणी होत आहे.
मंगळवेढा पोलीस ठाण्याअंतर्गत 81 गावे आहेत.

गेल्या मे महिन्यात 1 घरफोडी व माचणूर येथील धनश्री पतसंस्था फोडण्याची घटना घडली.
या घटनेला अडीच महिन्याचा कालावधी लोटला.
अदयापही पोलीसांना चोरटे सापडले नाहीत!

जून महिन्यात 1 जनावर चोरीची घटना तसेच मारामारीची एक घटना व एक मोटारसायकल पळवून नेल्याची घटना घडली.
या तिन्हीही घटनेमधीलही आरोपी शोधण्यात पोलीसांना अद्यापही यश आले नाही.
जुलै महिन्यात चोरीच्या तीन घटना व मुलीला पळवून नेल्याची एक घटना घडली.
या आरोपीचा शोध  पोलीसांना अद्यापही लागलेला नाही.
खोमनाळ येथे अल्पवयीन मुलीचा एका गुरूजीने विनयभंग केला होता.

यामध्ये बाललैंगिक अत्याचार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.
ही घटना घडून तीन आठवड्याचा कालावधी लोटला अद्यापही तपास अधिकार्‍याला ते गुरूजी सापडले नाहीत.

मरवडे येथून   एका अल्पवयीन मुलीला मे महिन्यात पळवून नेल्याची घटना घडली.
या घटनेतील आरोपीला पोलीसांनी अद्यापही पकडलेले नसल्यामुळे पिडीत मुलीच्या आई-वडिलांनी न्यायासाठी कोल्हापूर परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले.
ब्रम्हपुरी येथून एक अल्पवयीन मुलीला पळवून नेले.
या घटनेतीलही आरोपी अद्यापही फरार आहे?

सिध्दापूर येथील बेकायदा वाळू उपसाप्रकरणात चोरीचे गुन्हे दाखल असल्याने 26 जण फरार आहेत.
एकंदरीत मंगळवेढा पोलीस ठाण्याला सक्षम अधिकारी नसल्यामुळे मंगळवेढा पोलीस ठाण्याचा कारभार ढेपाळला आहे.

गुन्ह्यांचा तपास वेळेत होत नसल्यामुळे पिडीतांना लवकर न्याय मिळत नाही.
परिणामी पिडीत लोक पोलीस ठाण्याच्या आवारात येवून न्यायाच्या प्रतिक्षेत बसत असल्याचे चित्र आहे!

कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी विरेश प्रभू यांनी मंगळवेढा पोलीस ठाण्याला सक्षम अधिकारी नेमूण रेंगाळत पडलेले गुन्हे मार्गी लावावेत व फरार आरोपींना तात्काळ पकडण्यात यावे अशी मागणी जनतेमधून होत आहे?

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT