भाड्याच्या घरात फिटनेस च्या आड़ मध्ये सेक्स रॅकेटचा पर्दाफाश !

images(76)

प्रतिनिधि.

ठाणे ,नौपाड्यातील दमाणी इस्टेटमध्ये एका इमारतीत भाड्याच्या घरात सुरू असलेले शरीरविक्रयाचे रॅकेट ठाणे पोलिसांच्या अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाने उद्ध्वस्त केले आहे.

भाडेकरू महिलेबरोबर दलाल अशा दोन महिलांना अटक करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे फिटनेसच्या नावाखाली नामांकित वर्तमानपत्रात जाहिरात दिली जात होती.

जया देबब्रत नंदी (४८, भाडेकरू), नसिमा इस्लाम सलमानी उर्फ काजल ठक्कर उर्फ नेहा (३७, दलाल) अशी या महिला आरोपींची नावे आहेत.

‘नवु खुलेलू नेहा बुटी पार्लर’ तसेच मोबाइल क्रमांक जाहिरातीत दिला जात होता. या क्रमांकावर संपर्क साधताच पैशाच्या मोबदल्यात ग्राहकांना महिला पुरवण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांना मिळाली होती!

त्यानुसार गुरुवारी सायंकाळी पोलिस पथकाने नौपाडा दमाणी इस्टेट येथील बिल्डींग नंबर ६ रूम नंबर २ मध्ये छापा मारत जया आणि नसिमा या दोघींना ताब्यात घेतले.

आरोपी महिलांनी आपसात संगनमत करुन एका पीडित महिलेस काही रकमेचे आमिष दाखवून तिच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता.

विशेष म्हणजे जया राहत असलेल्या घरातच शरीरविक्रयाचा हा प्रकार सुरू होता.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT