भाजपा मंत्री यशवंत सिन्हा ना असे का बोलत आहेत देशद्रोही, गद्दार ?
प्रतिनिधी.
माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी काश्मीरमधील फुटीरतावाद्यांची भेट घेतल्यानंतर पक्षातील वातावरण चांगलेच तापले आहे.
भाजपामधूनच त्यांच्यावर जोदार टीकेची झोड उठली आहे.
केंदीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी त्यांचा उल्लेख देशद्रोही, गद्दार असा केला आहे.
देशाची अर्थव्यवस्था आणि केंद्र सरकारच्या कारभारावरून मोदी सरकारवर टीका करणार्या सिन्हा यांच्यावर टीका होत आहे.
बाबूल यांनी ट्विटकरून, सिन्हा तुमच्याकडे पक्षाला देण्यासारखे काहीच नाही.
तुम्ही विकासाच्या आड येत आहात. भाजपाच्या तरुण नेतृत्वाला तुम्ही आदर्शवत वाटला पाहिजे,
मात्र तुमच्याकडून काही अपेक्षाच करणे चूकीचे असल्याचा सिन्हा यांच्यावर आरोप केला आहे.
अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांच्या संपत्तीच्या मुद्यावरुनही सिन्हा यांनी भाजपची कोंडी करण्याचा प्रयत्न केला होता.
जय शहा प्रकरणात भाजपने आपली नैतिकता गमावली असल्याचे त्यांनी म्हटले होते.
तसेच त्यापूर्वी देशाच्या आर्थिक स्थितीवरून सिन्हा यांनी मोदी सरकारवर टीका केली होती.
त्यामुळे सिन्हा यांच्यावर भाजपच्या नेत्यांकडून सातत्याने टीका होत आहे.
ज्या पद्धतीने केंद्रीय मंत्री त्यांच्या बचावासाठी उभे राहत आहेत.
त्यावरून डाळीत काहीतरी काळे असल्याचे सिद्ध होत आहे,
अशी शंका यशवंत सिन्हा यांनी उपस्थित केली होती.
त्यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांनी सिन्हा यांना देशद्रोही, गद्दार असे संबोधले आहे.