पोंभुर्लेत दर्पण पुरस्काराने उद्या शनिवारी पत्रकारांचा होणार गौरव कोकणस्थ पत्रकरास स्वर्ण संधि !

IMG_20180105_172452

प्रतिनिधी.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचा राज्यस्तरीय पत्रकार दिन: मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कारांचे वितरण !

महाराष्ट्र सिंधुदुर्ग कणकवली इथे,महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी व वृत्तपत्र विद्या विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने, पोंभुर्ले ग्रामस्थ व जांभेकर कुटुंबिय यांच्या सहकार्याने मराठी भाषेतील पहिल्या दर्पण वृत्तपत्राचा वर्धापनदिन म्हणजेच राज्यस्तरीय पत्रकार दिन व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारितेचा गौरव समारंभ शनिवार ६ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १०.३० वाजता पोंभुर्ले, ता.देवगड येथील दर्पण सभागृहात आयोजित करण्यात आला आहे़ .

या कार्यक्रमाला शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे कुलगुरु, प्रसिद्ध शिक्षणतज्ञ डॉ. देवानंद शिंदे, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ, कोल्हापूर विभागीय माहिती उपसंचालक सतीश लळीत, सरपंच सादिक डोंगरकर यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे़!

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रत्नागिरी टाईम्सचे आवृत्तीप्रमुख लक्ष्मीकांत भावे, पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी भगवान लोके,कोकणचा तडाखा या साप्ताहिकाचे संपादक व दैनिक सामनाचे पत्रकार व कोकणचा तडाखा या सोशल मिडियाचे सर्वेसर्वा आबा खवणेकर,रत्नागिरी टाईम्सचे रवी गावडे,झी २४ तासचे विकास गावकर, दुरदर्शनचे विजय गावकर, सिंधुदुर्ग लाईव्हचे ब्युरो चिप सागर चव्हाण, आपला कोकण लाईव्हचे विशाल रेवडेकर, डीडी न्युजचे तेजस देसाई, सिंधुदुर्ग लाईव्हचे राजन चव्हाण, कोकण नाऊचे संपादक निलेश जोशी, देवदूर्ग साप्ताहिकचे संपादक आनंद लोके, अणूरेणू साप्ताहिकाचे संपादक महेश खोत, ज्येष्ठ पत्रकार दिलीप हिंदळेकर,यासह जिल्ह्यातील पत्रकारीतेत काम करणाºया पत्रकारांचा सन्मान दर्पण पुरस्कार देऊन करण्यात येणार आहे़.

महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीने राज्यात प्रथमच ज्येष्ठ व गुणवंत पत्रकारांना आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ दर्पण पुरस्कार देण्यास १९९३ मध्ये सुरुवात केली.

गेली २५ वर्षे हे पुरस्कार नियमितपणे दिले जातात.
दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे पोंभुर्ले येथील स्मरणकार्यही १९९३ रोजीच सुरु झाले.
त्यालाही यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

ऐतिहासिक अशा या दोन्ही रौप्यमहोत्सवी उपक्रमानिमित्त सामाजिक कृतज्ञता म्हणून संस्थेतर्फे दर्पणकारांचा वारसा जपलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रकारांचा दर्पण पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे कार्यकारी विश्वस्त विजय मांडके यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे़.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT