तब्बल सव्वाशे वर्षानंतर मुंबईचा डब्बा का होणार पहिल्यांदाच बंद ?
प्रतिनिधि.
मुंबईचा डब्बेवाला (कधीही सुट्टी न घेणारा) आजपर्यत मुंबईचे डब्बे बंद हा प्रकार अपवादानेच घडला आहे.
तसेच माथाडी कामगार जे डोक्यावर (माथ्यावर) वजन वाहतात.
यांनी मराठा मोर्चात भाग घेण्याचे ठरविले आहे.
१९८९ साली झालेल्या अण्णासाहेब पाटलांच्या मराठा आरक्षणाच्या मोर्चात यांनी सहभाग घेतला होता.
जवळपास ९०% डब्बेवाले व माथाडी कामगार हा मराठा आहे.
मराठा पैशाने सधन असतात हे म्हणा-यांनी याचा विचार करावा.
कुटूंबासहीत दोन लाखाच्यावर डब्बेवाले व माथाडी कामगार मोर्चात सहभागी होणार आहेत.
मुंबई, पुणे, नाशिक ईत्यादी भागातून माथाडी कामगार सहभागी होणार.
तब्बल सव्वाशे वर्षाच्या इतिहासात मुंबईतील डब्बेवाला पहिल्यांदाच सुट्टी घेऊन 9 ऑगस्टच्या मराठा क्रांती मुक महामोर्च्यात सहभागी होणार आहे !