टीपू सुल्तान चे वंशज शहज़ादे सय्यद मंसूर अली चे उत्कृष्ट वक्तव्य आज देशाला शहिद टिपु सुलतानयां च्या विचाराची गरजआहे!

IMG-20171119-WA0097

रिपोर्टर.

मस्जिद रोड आजम गंज गोलाई, लातूर येथे शेर -ए – हिंद शहिद टिपू सुलतान यांच्या २६७ व्या जयंतीनिमित्ताने सार्वजनिक जयंती समिती- २०१७ यांच्यावतीने टिपु सुलतान गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पाडण्यात आला !

याप्रसंगी शेर- ए- हिंद शहिद टिपु सुलतान यांचे वशंज शहजादा सय्यद मन्सुरअली यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले !

याप्रसंगी अवयव दाता किरण लोभे यांच्या आई लता लोभे, आदर्श शिक्षक जिलानी हिप्परगे, उत्कृष्ट पत्रकार प्रा. खय्युम शेख यांना टिपु सुलतान गौरव पुरस्कार, इंटरनॅशनल किक बॉक्सिंग एम.एम.ए. लातूर जिल्ह्यातील पहिली महिला हिना शेख, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. रफिक शेख, शैक्षणिक क्षेत्रात इब्राहीम जाकीर तांबोळी, शाहेदा पठाण, डॉ. परमेश्‍वर अंतेवार, शादुल शेख यांना टिपु सुलतान गौरव पुरस्कार संन्मानित करण्यात आले !

याप्रसंगी बोलत असताना शहजादा सय्यद मन्सुर अली यांनी आज देशातील वातावरण व वाढता जातीवाद यावर बोलताना म्हणाले की आज देशाला खर्‍या अर्थाने टिपु सुलतान यांच्या विचाराची नितांत गरज आहे !
व शहिद टिपु सुलतान हे सर्व धर्माचे प्रतिक होते.
इंग्रजी वटहुकमांच्या विरूद्ध स्वातंत्र भारताची सुरूवात त्यांनी केली.
शहीद होणारे स्वातंत्र्य लढ्यातील पहिला राजा कोण असेल तर टिपु सुलतान आहेत !

केवळ वादग्रस्त भाषणे न करून समाज एकत्र कसा येईल याकडे आम्हाला जास्त लक्ष दिले पाहिजे असे यावेळी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मौलाना इस्त्राइल होते. व या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध विचारवंत डॉ. जर्रा काझी, मोहसीन खान हे होते !
तर आपले मनोगत व्यक्त करताना सार्वजनिक टिपु सुलतान जयंतीचे अध्यक्ष म. ताहेर शेख व मौलाना उवेस कास्मी, अंतेश्‍वर गायकवाड, साहेबाअली सौदागार यांनी मनोगत व्यक्त केले !

यावेळी उपस्थित मुफ्ती सोहेल, आरीफ सिद्धीकी, कलिम पटेल, ऍड. फारूख शेख, डॉ. जहॉगीर शेख, इम्रान सय्यद, ऍड. महम्मद अली, उमरदराज खान हे होते !

तर प्रास्ताविक ऍड. मुस्ताक सौदागर व रियाज शेख यांनी केले. तर आभार खय्युम शेख यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष युसुफ शेख, शादुल शेख, सत्तार शेख, अफजल लोखंडवाला, मुजाहीद खान पठाण, वशिम शेख आदी उपस्थित होते !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT