झाड अंगावर पडलेल्या वकिलाचा अखेर मृत्यू !

IMG-20170723-WA0011

प्रतिनिधि.

ठाण्यातील पाचपखाडी येथील उदय नगर येथे सोसायटीतील झाड रस्त्यावरून बाईकवर जाणाऱ्या वकील किशोर पवार (वय-39 वर्ष) यांच्या अंगावर पडल्याची घटना शुक्रवारी घडली होती.

जखमी किशोरला स्थानिक नागरिकांनी कौशल्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

त्याच्या डोक्याला व मानेला गंभीर जखम झाली होती तेव्हापासून डॉक्टर त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करीत होते परंतू अखेर शनिवारी सायंकाळी त्याचा मृत्यू झाला .

त्याच्या मागे एक मुलगा,बायको,आई व वडील असा परिवार आहे.

किशोरच्या मृत्यूने नामदेववाडी, पाचपखाडी भागात शोकाकूल पसरली आहे!

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT