गुंगीचे औषध पाजून डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार !

download (26)

प्रतिनिधि.

ज्यूसमधून गुंगीचे औषध पाजून तरुणीवर डॉक्टरने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

याप्रकरणी पीडित तरुणीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बलात्कारी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी डॉक्टर फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ पूर्वमध्ये एका कॉलनीत ३० वर्षीय पीडित तरुणी राहते.
ती ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका हायफ्रोफाई खाजगी हॉस्पिटलमध्ये स्वागतिका म्हणून काम करीत होती.

त्याच हॉस्पिटलमध्ये सतीश डॉक्टर म्हणून कार्यरत आहे.
एकाच हॉस्पिटलमध्ये कामाला असल्याने दोघाची ओळख झाली.

या ओळखीचा फायदा घेत, सप्टेंबर २०१६ मध्ये डॉक्टरने पीडित तरुणीला तो राहत असलेल्या ठाण्यातील माजिवाडा येथील घरी नेले.

त्यानंतर तेथे त्याने या तरुणीला गुंगीचे औषध ज्यूसमध्ये टाकून दिले आणि तिच्यावर बलात्कार केला.
घटनेनंतर आरोपी डॉक्टरने पीडित तरुणीची समजूत काढण्यासाठी तिला लग्नाचे आमिष दाखवले.
पीडित तरूणी या अमिषाला बळी पडली. मात्र तो डॉक्टर एवढे करूनच थांबला नाही.

तर लग्नाच्या अमिषावर त्यांने पुढील काळातदेखील पीडितेवर कधी तिच्या राहत्या घरी तर कधी त्याच्या घरी वारंवार बलात्कार केला.

त्यानंतर पीडित तरुणीने डॉक्टरकडे लग्न करण्याची मागणी केली.

मात्र तो टाळाटाळ करू लागला. यावरून आपली फसवणूक केल्याचे पीडित तरुणीला समजल्याने तिने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणूक व बलात्काराची तक्रार दाखल केली.
या प्रकरणी पोलिसांनी डॉ. सतीश विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहे !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT