गरोदर महिलेस भोवला सेल्फी चा नाद सिंहगडावरून 150 खोल वर पडली !
प्रतिनिधि.
पुणे येथील सिंहगडावरील नरवीर तानाजी मालुसरे कडा आहे येथे धोकादायक ठिकाणी सेल्फी काढताना गरोदर महिला कड्यावरून खाली कोसळली.
स्थानिकांच्या मदतीने तिला बाहेर काढण्यात यश आले असून, तिला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सेल्फिच्या मोहापायी दररोज अनेक दुर्घटना घडत आहेत, त्या सोशल मिडीयावरून वाचल्या जात आहेत,
सेल्फी काढणाऱ्यांना मूर्ख ठरवले जाते आहे.
मात्र स्वत:चा सेल्फी घेण्याची वेळ येते तेव्हा, त्या बाबींकडे कानाडोळा करून धोका पत्करला जात असल्याचे समोर येते आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रणिता लहू इंगळे (वय २८ , रा.लातूर) असे पाय घसरून नरवीर तानाजी मालुसरे कड्यावरून अंदाजे १५० फुट खोलीवर पडलेल्या गरोदर महिलेचे नाव आहे.
ही घटना काल शनिवार (दि.5) सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली.
जखमी प्रणिता तिचा पती लहू आत्माराम इंगळे, भाऊ सुरेश दत्तात्रय जगताप यांच्या बरोबर गड पर्यटनासाठी आली होती.
यावेळी गडदर्शन करत असताना नरवीर तानाजी मालुसरे कडा येथे ते उभे होते.
कड्यावरून खाली दिसणारे सौंदर्य पाहून प्रणिता मधील अतिउत्साही तरुणी जागी झाली.
तिला सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.
तिने कड्या जवळ लावण्यात आलेल्या सुरक्षाकठड्याजवळ उभे राहून अगोदर काही सेल्फी काढले.
मात्र आणखीन चांगला फोटो यावा या उद्देशाने ती सुरक्षा कठडा ओलांडून बाहेर गेली.
मात्र गेल्या काही दिवसांमध्ये चांगला पाऊस झाल्याने, त्यातच उंच भाग असल्याने वातावरणात गारवा असल्याने कठड्याबाहेरील वापर नसलेल्या जमिनीने शेवाळ पकडले होते.
मात्र सावध फोटो घेत असतानाच, निरनिराळ्या पोज देण्याच्या नादात, शेवाळावरून तिचा पाय घसरला आणि ती पडली.
डोळ्यासमोर पाहता पाहता गरोदर पत्नी कड्यावरून पडलेली पाहून, पती लहू आणि भाऊ सुरेश यांनी मदतीसाठी एकच टाहो फोडला.
यावेळी काही पर्यटकांनी गडावरील स्थानिक रहिवाश्यांच्या, व्यावसायिकांच्या मदतीने श्री अमृतेश्वर मेटेच्या अरुंद पायवाटेने आडवे खाली उतरत पडलेल्या प्रणिताच्या आवाजाच्या दिशेने जात, तिला शोधून उचलून वर आणून तातडीने उपचारार्थ खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तिला वर आणल्यानंतर अनेकांना ती गरोदर असल्याची माहिती मिळाली आणि पर्यटकांसह, स्थानिकांच्या हृदयाचा ठोका चुकला.
करणा अंदाजे दहा ते पंधरा मजल्याएवढ्या उंचीच्या
इमारतीवरून जेवढी खोली वाटते, तेवढ्या खोलीवर प्रणिता पडली होती.
ती आणि तिचा गर्भ सुरक्षित राहो अशी यावेळी सर्वांनी प्रार्थना केली.