कायदा हाती घेणार्यावर कड़क कार्रवाई चे निर्देश ‘ते’ पोलीसही रडारवर !आणि बकरी ईदसाठी विशेष दक्षता, व्यापा-यांना त्रास देणा-यांचे होणार तत्काळ निलंबन !

images (72)

प्रतिनिधि.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पशू व्यापारी व मुस्लीम बांधवांना कथित गोरक्षकांकडून होणा-या त्रासाबाबत योग्य खबरदारी घेतानाच, या प्रकरणी बंदोबस्तावरील पोलीसही महासंचालकांच्या रडारवर राहणार आहेत.

व्यापा-यांना दमदाटी करून पैसे उकळणा-याचा प्रयत्न करणा-या अधिका-यांना, तत्काळ निलंबित करण्याचे आदेश पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी राज्यातील सर्व आयुक्त व अधीक्षकांना दिले आहेत.
त्याचप्रमाणे, गोमांसाबाबत स्वत: व्यापा-यांवर कारवाई न करता, त्याबाबत पहिल्यांदा पोलिसांना माहिती द्यावयाची आहे.

त्यांनी कायदा हातात घेतल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे.
कथित गोरक्षकांकडून होणा-या हल्ल्याबाबत न्यायालयाने चिंता व्यक्त करीत, त्याबाबत कडक कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत.

त्याचबरोबर, गणेशोत्सव येत असल्याने, या दोन्ही उत्सवांच्या पार्श्वभूमीवर महासंचालक माथुर व अपर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपिन बिहारी यांनी गुरुवारी बंदोबस्ताबाबत परिपत्रक जाहीर केले आहे.

त्यामध्ये तीन राज्यांच्या सीमा भागातून जनावरांची आयात होत असल्याने, या ठिकाणच्या विविध मार्गांवर २७ तपासणी नाके बनविण्यात आले आहेत.

त्याशिवाय पोलिसांनी जनावरांचा बाजार होणारे ठिकाण, अधिकृत कत्तलखाने या ठिकाणी विशेष बंदोबस्त नेमण्यात येणार असून, या ठिकाणी येणाºया जनावरांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग केले जाणार आहे.

गोरक्षकांनी कायदा हातात न घेता, त्यांच्याकडील माहिती नजीकच्या पोलिसांना द्यावी,
त्याबाबत तत्काळ कार्यवाही केली जाईल. मात्र, त्यांनी स्वत:हून शांतता बिघडवून कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न केल्यास, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल !

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT