औरंगाबाद मधून मनसे ला अच्छे दिन ची सुरुवात !
प्रतिनिधी.
औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे सध्या औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत.
त्याचे औचित्य साधून अनेक पक्षतील नेते मंडळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्यासाठी उत्सूक असल्याचे पाहावयास मिळत आहे.
त्याचा पहिला धक्का सेनेला बसला आहे, कारण औरंगाबादचे माजी महापौर राहिलेल्या एका दिग्गज नेत्याने त्यांच्या सर्व समर्थकांसोबत मनसे’मध्ये जाहीर प्रवेश घेतला आहे.
शिवसेनेचे माजी महापौर सुदाम मामा सोनावणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत जाहीर प्रवेश केला आहे.
मनसेकडून त्यांना मोठी संधी मिळण्याची शक्यता असून त्यांचा शहरात चांगला दबदबा असल्याचं समोर येत आहे.
सध्या मनसेला आगामी निवडणूका पोषक असून, त्याचा पक्षाला मोठा फायदा होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक बोलून दाखवत आहे. त्यामुळे इतर पक्षातील नेत्यांचा ओढा मनसेकडे वाढताना दिसत आहे.
मनसेमध्ये आगामी काळात अजूनही इनकमिंग सुरु राहण्याची शक्यता असून इतर पक्षातील अनेक नाराज नेते मनसेच्या संपर्कात असल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे मनसे इतर पक्षांना अजूनही राजकीय धक्के देताना दिसेल.
शिवसेनेत सध्या अंतर्गत सुप्त नाराजी असून शिवसेनेचे विद्यमान आमदार थेट पक्षाच्या मंत्र्यांवर खुलेआम आरोप करत आहेत.
त्यामुळे शिवसेनेतील नाराजी भविष्यात उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही!