वर्तक नगर पुलिस ठाणे आणि राज्य उत्पादन शुल्क ठाणे ची वसूलीबाजी

येऊर मध्ये वसुली करण्याचा नवीन कायदा?

वर्तक नगर पोलिस स्टेशन आणि राज्य उत्पादन शुल्क,ठाणे यांनी आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड साहेबांनी विधानसभेत येऊर इथे चालत असलेले अनधिकृत हॉटेल बद्दल निर्देशनात आणल्यानंतर, ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभाग व वर्तक नगर पोलीस स्टेशन यांनी येऊर इथे चालत असलेले अनधिकृत परवानाशिवाय दारू विकणारे हॉटेल यांच्यावर कारवाई करण्याऐवजी FL-III लायसेन्स धारक हॉटेलवर कारवाई करायला सुरुवात केली आहे.

एकीकडे जिथे बिन परवाना असलेले हॉटेल रात्री २ ते ३ वाजेपर्यंत सुरू असतात तिथेच परवानाधारक हॉटेल्स यांना मात्र रात्रि ११ वाजता बंद करण्यात येतात. अनाधिकृत हॉटेल्स वरून राज्य उत्पादन शुल्क आणि ठाणे पोलिसांना जाडी कमाई होते म्हणून या अनधिकृत बिनपरवाना दारू विकणाऱ्या हॉटेलवर कारवाई केली जात नाही.

येऊर मध्ये अजब कारभार सुरू आहे.तसेच ठाणे प पोखरण रोड NO 1. वर्तक नगर नाका,भीम नगर सहयाद्रि मेडिकल स्टोर समोर शिवाजी मार्केट गाला क्रमांक 1आणि2 येथें मोठा मटका जुगार अड्डा तीन वर्षानी चालू आहे.त्यात सुधा स्थानिक पुलिस चा कायदा झोपी गेलेला आहे. फक्त स्वतःची कमाई बघायची बाकी कायदा कानून गेला खड्ड्यात असा धोरण हा राज्य उत्पादन शुल्क,ठाणे व वर्तक नगर पोलीस स्टेशन चा झाला आहे. एकाच गुन्हेसाठी दोन प्रकारचे कायदे कशे काय

बनतात हे ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि वर्तक नगर पोलिस स्टेशनचे अधिकारी यांना विचारावा. महाराष्ट्र चे उप मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री याना याची जाग झाली पाहीजे.

साभार
एक ठाणेकर
योगेश मुंधरा

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT