ये वही है आशा पारेख,आशा जी सौंदर्यवती न हो ती लाखो दिलांची धड़कन पण नाहिये

मुम्बई
प्रतिनिधि

उत्कृष्ट नर्तिका करते, तसाच तिचा अभिनय असे. आशाचे अपील होते, तिच्या फेमिनाइन आवाजात! तिच्या अभिनयात सहजता असे.
अनेक चित्रपटांत आशा बडे बाप की टॉमबॉइश बेटी असे.
नायकाशी टक्कर, वाद आणि नंतर प्रेम.. ते एकदा जागृत झाले, की मग नायिका असलेल्या आशाच्या स्त्रीसुलभ भावना प्रकट होऊ लागत… बिमल रॉय यांनी एका डान्स शोमध्ये तिला पाहिले आणि आपल्या ‘माँ ‘ व ‘बाप बेटी’ मध्ये तिला बालभूमिका दिल्या. ‘
धोबी डॉक्टर’ आणि ‘अयोध्यापती’ या चित्रपटांत आशाने बालभूमिकाच केल्या. 1957 साली ‘आशा’ मध्ये एका डान्समध्ये ती वैजयंतीमाला बरोबर दिसते.
‘गूँज उठी शहनाई’ मध्ये नायिका म्हणून आशाची निवड झाली होती, परंतु तिच्यात स्टार मटेरियल नाही, असा साक्षात्कार होऊन, निर्माते विजय भट्ट यांनी तिच्याऐवजी अमिताला घेतले.
अमितामध्ये कोणते स्टार मटेरियल होते, हे विजयभाईच जाणोत! शशधर मुखर्जी यांनी ‘दिल देके देखो’ मधून 1959 साली आशाला नायिकेच्या भूमिकेत कास्ट केले.
तेव्हा शम्मी कपूरने सिनेमात अभिनय कसा करावा, याच्या बऱ्याच टीप्स तिला दिल्या. परंतु त्यानंतर जवळपास सात वर्षे दोघे कोणत्याही चित्रपटात दिसले नाहीत.. ‘तीसरी मंजिल’मध्ये मात्र त्यांची जोडी हिट ठरली.
‘दिल देके देखो’ च्या प्रीमियरला राज कपूर, गीता बाली, निरुपा रॉय वगैरे आले होते, हे मला वाचल्याचे स्मरते.
धर्मेंद्रबरोबर आशाची जोडी खऱ्या अर्थाने जमली. आये दिन बहार के, शिकार, आया सावन झुमके, मेरा गाँव मेरा देश, समाधी वगैरे. ‘मेरा गाँव’च्या शूटिंगच्या वेळी जमलेल्या बघ्यांपैकी एकाने आशाची छेड काढल्यानंतर, धर्मेंद्रने त्याला बुकलून काढल्याची आठवण आशाने रेडिओवरून सांगितल्याचे मला आजही आठवते.
राजेश खन्नाबरोबर आशाने बहारों के सपने, आन मिलो सजना आणि कटी पतंग हे चित्रपट केले. परंतु त्यांची मैत्री झाली नाही.
‘कटी पतंग’ साठी आशाला उत्कृष्ट अभिनेत्रीचे पारितोषिक मिळाले, परंतु नायिका म्हणून तिची करिअर नंतर उतारास लागली. ‘अनजान राहें’ नावाचा ती, फिरोज खान व अकबर खानचा एक भयानक चित्रपट मी का बघितला, ते कोणास ठाऊक!
आशाने वहिनीच्या वगैरे चरित्र भूमिका केल्या. अमिताभबरोबरचा तिचा ‘कालिया’ आठवतो.
वहिदा, चरित्र अभिनेत्री शम्मी, हेलन व आशा या एकत्र सिनेमाला जात, बाहेर जेवायला जात.
नंदा आणि साधना या आशाच्या जवळच्या मैत्रिणी. नासिर हुसेनने आशाला अनेक चित्रपटांत संधी दिली.
आशा पारेख सिनेमातल्या आईच्या टिपिकल भूमिकांत अडकून पडली नाही. सुदैवाने तिची निरुपा रॉय झाली नाही.
तिने ‘आकृती’ टेलिव्हिजन प्राॅडक्शन कंपनी काढून सिरीयल बनवल्या. एकता कपूरचे पदार्पण होण्यापूर्वीचा हा काळ.
आशा सेन्सॉर बोर्डाची अध्यक्ष होती तसेच सिने ॲंड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनचे नेतृत्वही तिने दीर्घकाळ केले.
आशाची डान्स अकॅडमी आहे आणि मुंबईत ‘आशा पारेख हॉस्पिटल’देखील आहे.
दो बदन, कटी पतंग अशा रडक्या चित्रपटांत आशा सर्वसामान्य प्रेक्षकांना आवडली असली, तरी तिचा हलकाफुलका आणि विनोदी अभिनय मला जास्त आवडत असे.
नाकाखाली बोट आडवे घासून हू: करणे वगैरे.. आशा पारेखने दिलेत तेवढे यशस्वी चित्रपट फार कमी अभिनेत्रींनी दिले.
तिचा ‘साजन’ या चित्रपटातील विनोदी दृश्यांतील अभिनय मला खूप आवडला होता.
या सिनेमातील काही सीन्स तर तिने अक्षरश: जिंकून घेतले आहेत. जॉय मुखर्जी किंवा विश्वजीतबरोबरचे तिचे चित्रपट यशस्वी ठरले, ते संगीतामुळे आणि त्यात आशा असल्यामुळे!
गुजराती असूनदेखील आशाचे हिंदी उच्चारण अतिशय चांगले होते.
आशाच्या डोळ्यांत विलक्षण चमक दिसे.
‘तेरी आँखों के सिवा दुनिया में रखा क्या है’ असेच तिच्याकडे बघून वाटायचे… 2 ऑक्टोबरलाच आशाने 80 व्या वर्षांत पदार्पण केले.
ही पोस्ट लिहायला दोन दिवस उशीरच झाला. आशा पारेखला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा!-
साभार:
हेमंत देसाई

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT