येत्या ८मार्च महिला दिवस निमित्त राज्यतील महिला साठी आत्मसम्मान योजना मोहिम आरंभ केली जात आहे काय आहे विशेष ?

images (41)

रिपोर्टर:-

राज्यातील महिलांना आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी शेतीच्या सात बारा उताऱयावर पतीपत्नीचे नाव लावण्याबरोबरच मालमत्तेवर पतीपत्नीचे नाव लावण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे.

येत्या 8 मार्चला जागतिक महिला दिन आहे.
त्यानिमित्त राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत येत्या जागतिक महिला दिनापासून महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे,

अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शेत दोघांचे योजनेअंतर्गत सात बारा उताऱयावर पतीपत्नीचे नाव लावण्याबरोबरच घर दोघांचे योजने अंतर्गत नमुना क्रमांक 8वर पतीपत्नीचे नाव लावण्यात येईल.

त्याशिवाय महिला बचतगटांना प्रदर्शने, काॅप शॉप तसेच सहकारी आणि काॅर्पोरेट मॉलमध्ये उत्पादनांच्या विक्रीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील.

महिलांसाठी आत्मसन्मान योजनेत काय करणार
‘ महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान
हिमोग्लोबीन व बीएमआय तपासणी,
सकस आहाराबद्दल मार्गदर्शन उपजीविकेचे स्त्राsत वाढवणार महिला बचतगटांच्या उत्पादनांचे मार्पेटिंग पायाभूत प्रशिक्षण काैशल्य प्रशिक्षण तंबाखूमुक्ती-मशेरीमुक्ती अभियान,
काैटुंबिक हिंसाचार रोखण्यासाठी कायद्याची माहिती.

SHARE THIS

RELATED ARTICLES

1 COMMENT

LEAVE COMMENT