महाराष्ट्र सरकार मेहरबान मराठवाडा-विदर्भातील शेतकऱ्यांसाठी सरकारने घेतला हा मोठा निर्णय !

download (33)

औरंगाबाद: विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे सावकारी कर्जही माफ होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी याबाबतचा निर्णय घेतला आहे.

नुकतंच पणन आणि वस्त्रोउद्योग मंत्रालयाने याबाबतचा शासन निर्णय जाहीर केला आहे.
यानुसार विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतले असतील तर शासनामार्फत संबंधीत सावकारास ती रक्कम अदा करण्यात येईल.
विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज शासनामार्फत संबंधित सावकारास देण्यात येईल.
अशा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

दरम्यान, सावकाराने सावकारी परवान्यात नमूद केलेल्या क्षेत्राच्या बाहेर दिलेलं कर्ज या योजनेस अपात्र ठरवण्यात आलं होतं.
त्या पार्श्वभूमीवर ही अट रद्द करुन ज्या सावकारांनी कार्यक्षेत्राबाहेर कर्जवाटप केलं आहे. त्या शेतकऱ्यांची कर्ज माफ करण्यास मान्यता देण्यात आली आहै।

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT