पनवेल में फायरिंग काय आहे प्रकरण?

IMG_20210124_221502

रिपोर्टर:-

दिनांक 23.1. 2021 रोजी 22.00 वा.चे दरम्यान इसम नामे प्रतीक रवींद्र आहेर वय 24 वर्षे धंदा. इस्टेट एजंट रा. 103 माऊली आशिष अपार्टमेंट झिरा आळी पेन शहर जिल्हा रायगड.
हा आज दुपारी पेन येथून 15:00 वाजता चे दरम्यान वाशी नवी मुंबई येथे त्यांचे दुचाकी क्रमांक एम एच झिरो 06 बी एच 6399 मेस्ट्रो याने फिरण्यासाठी आलेला होता.
रात्री 22.00 वा च्या दरम्यान वाशी येथून सायन पनवेल हायवे ने पनवेल कडे जाताना,कोपरी गाव बस स्टॉप च्या मागील रोड ने आत मध्ये जाऊन सिगरेट घेऊन ते पीत असताना ,

त्या ठिकाणी तीन अनोळखी इसम त्यांच्याकडे मोबाईल पैसे व दुचाकीची चावी मागू लागल्याने,
ते देण्यास नकार दिल्याने अनोळखी इसम पैकी एकाने जबरदस्तीने मोबाईल ओढु लागल्याने,
त्यास विरोध केल्याने प्रतीक आहेर यांच्या डाव्या पायाच्या मांडीवर अग्नि शास्त्रातून एक गोळी फायर करून ते तिघेही पळून गेले.
जखमीस पायामध्ये गोळी लागल्याने येथील जाणाऱ्या एका इसमाने पोलिसांना कळवले.

त्यास पुढील उपचार कामी सिटी हॉस्पिटल खारघर सेक्टर 7 येथे उपचार करण्यात येऊन
सध्या एमजीएम कामोठे हॉस्पिटल येथे उपचार घेत आहे .
जखमी इसमाची प्रकृती ठीक आहे.
सदरचा तपास कामी वरीष्ठ अधिकारी मा जय जाधव ,Jt CP मा प्रविण पाटील, Crime DCP, मा मेग॔ळे सो झोन 1 ,
मा नितीन भोसलेपाटील ACP पनवेल विभाग यांनी दिलेल्या सुचनाप्रमाणे गुन्ह्याचा तपास वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी हे करीत आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT