तुम्ही ‘मोदी समर्थक’ आहात की ‘मोदी विरोधक’ आहात ?

modi

रिपोर्टर:-

तर तुम्ही तुमच्या हक्कांसाठी लढू शकता की नाही?
सरकारच्या चुकीच्या धोरणांना विरोध करु शकता की नाही? हे महत्वाचे असेल.

‘नोटबंदी’ हा मोदी सरकारचा प्रचंड मोठा मास्ट्ररस्ट्रोक होता. या निर्णयाला केवळ राजकीय उद्देश होता.
नोटबंदीनंतर एक छादामही काळा पैसा जमा झाला नाही.
दहशतवाद, नक्षलवादाचे कंबरडे मोडले नाही. डिजीटल व्यवहार वाढले नाहीत.
जीएसटी’ ही करप्रणाली आल्यानंतर ‘एक देश एक कर’ जाहीरातबाजीवर कोट्यावधी रुपये खर्च केले. आजपर्यंतचे फलित पाहिले तर सर्वात गंडलेली ही करप्रणाली आहे.

कोरोना येण्याआधी जाहीरातबाज ५६ इंचीने ५७-५८ वेळा बदल करुनही राज्यांच्या वाट्याच्या कराचे पैसे द्यायला केंद्राकडे नव्हते!
कलम ३७०’ काँग्रेसने हळूहळू निकामी करत आणले होते.
उरलेले मोदींनी रातोरात हटवून त्याचे फायदे सांगण्यासाठी आयटी सेल रात्रंदिवस राबवला.
वर्षपूर्ती झाली तरीही तिथे कंपन्या उभारल्या गेल्या नाहीत. ना कोणी जमीन खरेदी केली, ना कोणी तिकडे सोयरीक केली.
याउलट पर्यटन व्यवसाय कायमस्वरुपी संपवलाय.
तीन तलाक’ विधेयक गरजेचं होतं पण केवळ पत्नीच्या एका तक्रारीवरुन अटक होऊन जामीन न मिळणे हे कलम चुकीचे होते यालाच विरोधकांचा विरोध होता.
बहुमताच्या जोरावर हेसुद्धा विधेयक आणलेच फलित काय?

तुमच्या विभागात या कायद्यांतर्गत गेल्या वर्षभरात किती जणांवर कारवाई झाली?
याचे उत्तर कोणीही देणार नाही कारण केवळ मुस्लीम समाजाला बदनाम करण्यासाठी आणि भिती घालण्यासाठी या कायद्यात अजामीनपात्र गुन्ह्याची तरतूद केली गेली.
NRC’ आसाममध्ये दोनवेळा राबवून झाली आहे.
कोट्यावधी रुपये खर्च करुन झालेत फलित काय? शून्य!
देशभरात क्षोभ उठला लोक रस्त्यावर येऊन विरोध करु लागले. एकट्या शाहीन बागेने सरकारच्या नाकात नऊ दम आणले.

देशभरात शाहीन बाग उभा राहू लागल्या. महाराष्ट्रात उस्मानाबादेत आंदोलन सुरु झाले.
मोदींनी धोका ओळखला तेव्हापासून आजतागायत अमित शहा मिडीयातून गायब आहेत.
लाॅकडाऊन’ चुकिच्या पद्धतीने अंमलात आणलेल्या लाॅकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार गेला. शेकडो लोक वाटेतच मेले.

कोरोना संसर्ग रोखला गेला नाहीच, पण कोरोनाच्या संसर्गात जगात दुसरा क्रमांक पटकावला!
जगाच्या कोरोनाबाधितांच्या संख्येच्या ३१% बाधित दररोज भारतात सापडतात. आरोग्यसुविधा अपुऱ्या आहेत. राज्यांना दिली जाणारी मदत बंद केलीय!
मोदीजींनी राबवलेल्या आजवरच्या काही निवडक मास्टरस्ट्रोकचे हे निवडक फलित आहे.

आजवरच्या या निर्णयांचा फोलपणा आणि राजकीय हेतू ओळखूनच शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.
जंगलात वणवा लागला की त्यातून ओलं लाकूडही वाचू शकत नाही.
२०१९ हि भारतीयांनी केलेली चूक सुधारण्याची संधी होती. ती संधी भारतीयांनी गमावली आहे.
या फेऱ्यातून कोणीही सुटणार नाही हे अंतिम सत्य आहे!
सबका नंबरआयेगा एक दिन एक के बाद एक।

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT