छत्रपति शिवाजी महाराज जयंती निमीत्त क़ाय आहे खरा इतिहास आणि सत्य ? जाणा !

images (5)

प्रतिनिधि.
पन्हाळ गडावर शिवरायांसाठी ज्याने केले शत्रूला हलाल तोच मावळा ‘सिद्दी हिलाल ‘
पन्हाळगड चा बाजी प्रभू देशपांडे चा इतिहास सर्वांनाच माहित आहे ,
परंतु बाजी प्रभू सोबत आपल्या प्राणाची बाजू लावणारे सिद्दी हिलाल यांचा ईतिहास दडवला गेला .
शिवाजी महाराज जेव्हा पन्हाळ गडावर अडकले होते तेव्हा आपल्या पाच पराक्रमी पुत्रांसोबत शत्रूशी झुंज देऊन महाराजांना सुखरूप बाहेर काढले आणि रायगडावर पोंचवले.

पन्हाळगडच नव्हे तर इतिहासातील महत्वपूर्ण लढाया सिद्दी हिलाल यांनी लढल्या . विशेष सरदाराचा दर्जा त्यांना महाराजांनी दिला होता .
सिद्दी हिलाल हे शहाजी राजे सोबत सक्रिय होते . जुनी परंपरा त्यांच्या अंगी होती .
आपला मुलगा सिद्दी वाहवाह याचे बलिदान पन्हाळ गडावर महाराजांच्या सूटके दरम्यान दिले हे इतिहासाची मोठी साक्ष आहे .
नाहि त्या खोट्या इतिहासाची साक्ष देऊन आज मुस्लिम समाजाला लक्ष्य केले जाते आज महाराज असते तर या खोटारड्या पुंग्या मांडणाऱ्यांची जीभ काढली असती .

महााजांच्या गुप्तहेर विभागाची कमान त्याचे नाव रुस्तुम-ए-जमान शिवराज्यचे स्वप्न साकार करण्यासाठी शत्रूच्या खाचा खळग्या जाणने खूप महत्वाचे असायचे म्हणून शिवरायांनी जिवाला जीव देणारी माणसे जोडली त्याला जगात तोड नाही.
आदिलशाह च्या दरबारी असला तरी रुस्तुम ए जमान आपल्या जीवाची बाजी लाऊन शिवरायांची मदत करीत असे .

शत्रूच्या गुप्त बातम्या महाराजांकडे पाठवत असे.
‘शिवबांच्या’ तोफांची शान ‘इब्राहीम खान’…
शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात शस्त्रसाठा मोठ्या स्वरुपात असायचा तलवारी , भाले , चिलखत ,
ढाली आणि विशेष म्हणजे तोफा . त्या काळात तोफखाने मोठ्या स्वरुपात असायचे बरयाचदा तोफ्खानाच युद्धात निर्णायक असे . बरेच राजे आपल्या तोफखाने आणि दारू गोळ्यावर जास्त लक्ष देत .
शिवरायांचा तोफखाना हि असाच होता कित्येक वेळी अनेक लढाईत इब्राहिम खान यांनी तोफांचा वापर करून शत्रूला सळो कि पळो केले .
शिवरायांनी तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान यालाच केले होते .

१७६१ च्या पानिपत युद्धात मराठयांच्या तोफखाना प्रमुख मुसलमान इब्राहिम खान गारदी होते.
सदाशिवराव भाऊंचे प्राण वाचविताना शहीद झाले होते.
सदाशिव भाऊ हे कोकणस्थ ब्राह्मण होते तर इब्राहिम खान हा मुसलमान मला या मर्द मावळ्याचे अभिमान वाटते .
छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारावरील वादळ म्हणजे दौलत खान , छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील आरमार प्रमुख आणि शत्रूच्या कोणत्याही अमिषाला बळी न पडलेला आणि महाराजांच्या निष्ठावान सरदाराचे उद्हारण म्हणजेच दौलत खान .

मरणाच्या दारात उभा असला तरी जिद्दीने लढणारा शूर योद्धा म्हणून ज्याची इतिहासात नोंद आहे.
१६७४ साली सिद्दी संबळने दौलत खान वर स्वारी केली होती त्याला पळताभुई करणारा हाच तो शूर मुस्लीम मावळा शिवछत्रपतींच्या कसल्याही प्रकारचे समुद्री संकट त्याने येऊ दिले नाही,
इंग्रज ,डच ,पोर्तुगीज यांना आपल्या राज्यात शिरकाव करू दिला नाही अशा जिगरबाज मुस्लीम मावळ्यांचे योगदान कमी आहे कि काय ?

आपली जात,धर्म ,पंत बाजूला सारूर ज्याने या राज्यासाठीच नव्हे तर देशासाठी , शिवरायासाठी आपल्या रक्ताचे पाणी केले अशा स्वराज्य निष्ठ मुस्लिम मावळ्यास अशा ’माझा मानाचा मुजरा .
शिवबांचा अंगरक्षक आणि शत्रुचा कर्दनकाळ -इब्राहिम सिद्धी
शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाचे जेव्हा नाव येईल तेव्हां ईतिहास आपोआप ओरडून एकच नाव सांगेल ते फक्त आणि फक्त इब्राहिम सिद्धी याचेच , अफजल खान याच्या भेटीसाठी महाराज जेव्हा गेले.

त्या वेळेस अंगरक्षक म्हणून इब्राहिम सिद्धी यांनाच घेऊन गेले होते , अफजल खान च अंगरक्षक कृष्णा भास्कर कुलकर्णी पुतण्या रहेमत खान , पिलाजी व शंकर मोहिते यांनी वार केला तेव्हा शिवरायांनी कृष्णा भास्करला उभा चिरला तर इब्राहिम सिद्धी यांनी रहेमत खान, पिलाजी आणि शंकर मोहितेला उभा छाटला .
कोंडाण्याचा किल्ला फक्त १ हजार २५० सैनिकांना घेऊन जिंकून महाराजांचे ‘ शिवराज्याचे ‘ स्वप्न कोंडाण्यावर विजयी निशाण फडकावणारा हाच तोमुस्लिम मावळा इब्राहीम सिद्धी.

आज याच मावळ्यास गद्दार , देशद्रोही , समाजकंठक आदी नावाने संबोधित केले जाते हेच दुर्भाग्य आहे . मीर महंमद नसता तर शिवबा समजले नसते
आज ज्या शिवछत्रपती शिवाजी महाराजांना रुबाबदार चेहरा मोहरा , रंग रूप , पोशाख , डोळे , नाक आदी काही आपण पाहतोय ते चित्र रेखाटणारा एकमेव मुस्लिम चित्रकार “मीर महंमद”होय .
औरंगजेब यांचा मुलगा शाह आलम याच्याकडे मीर महंमद होता.

शिवबांना तो खूप मानायचा त्याने महाराजांचे अनेक चित्र रेखाटले आहेत ,त्याकाळात रायगडावर अनेक पुरावे जाळण्यात आले होते.
पेरीसच्या संग्रहनालया मध्ये आज हि मीर महंमदने महाराजांचे रेखाटलेले चित्र उपलब्ध आहे. मीर महंमद ने जर हे चित्र रेखाटले नसते तर शिवबा कसे होते ते समजलेच नस्ते.

शिवरायांच्या नावाने जे आज मुस्लिम समाजाला कालबाह्य करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांनी या बाबतीत गंभीरपणे विचार करावा .

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT