ग्रामीण भगातून NEET परीक्षेत 572आयशा चे यश तर सद्दाम MPSC उत्तीर्ण भाऊ बहिनीचा संघर्ष प्रेरणादाई आणि अदभुत

परभणी
संवाददाता

परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील ग्रामीण भागातील विटा (बु) हे छोटस गाव गंगेच्या बाजुस वसलेले आहे.
या गावातील शेख कुटंबीय उमर हे योगेश्वरी सहकारी साखर कारखाना येथील कर्मचारी.
यांनी आपले दोन्ही पाल्याना अत्यंत आर्थिक परिस्थिती असतांना सुध्दा शिक्षण दिले.
कु.आयशा हि लहानपणी सावित्रीबाई फुले यांच्या वर आधारित भाषण करावयाची.
विटा ( बु ) येथून गंगाखेड येथे प्रवास करून शिक्षण हस्तगत केले.
कु.आयशा हिने वैद्यकीय शिक्षण मध्ये संघर्ष करून प्राप्त होण्यासाठी यशस्वी झाली.
तीने NEET मध्ये 572 गुण घेऊन उत्तीर्ण झाली तर सद्दाम हा मुलगा इंजिनिअरींगची पदवी घेतली असुन MPSC मध्ये उत्तीर्ण झालेला असुन निकाल आलेला आहे.
केवळ महाविकास आघाडी शासनाच्या निर्णयामुळे तो रुजू होवू शकला नाही .
ज्यांनी आपल्या पाल्याना शिक्षण दिले आर्थिक परिस्थितीचा गवगवा केला नाही.
आयशा & सद्दाम चा शिक्षणासाठी संघर्ष हा प्रेरणादायी आहे.
तर आई बाबा यांचे हि प्रयत्न व कष्ट हे उल्लेखनीय होय. हा मुस्लिम समाज आज अनेक समस्याना सामोरे जात असतांना या बहिण भावाचा हा संघर्ष समाजाला दिशा देणारा व प्रेरणादायी आहे.
शिक्षण हे वाघीनीचे दुध आहे जो चाखिल तो घुरघरल्या शिवाय राहणार नाही हे भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं आहे यविचाराने या बहिणी व भावाने शिक्षणाकडे वळले.
म्हणतात ना जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच खरी उद्धारी.
आई सौ.सुलतान उमर शेख यांचे माहेर फुलेपिंपळगाव बिड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील मौजे फुलेपिंपळगाव या छोट्याशा गावी त्यांनी मुलगी आहे म्हणून विचार केला नाही.
तर कु.आयशा हिच्या स्वप्न पुर्ण करण्यासाठी साथ दिली तर सद्दाम हा बालपणीच त्यांचा गुणवत्तापूर्ण शिक्षणाला महत्त्व दिले.
हेच आई बाबा ज्यांनी दोन्ही पाल्यांना गंगाखेड ते औरंगाबाद रेल्वेने कधीकाळी जेवणाचे डब्बे घरून पाठवले आपल्यातील गुण कु.आयशा (मुलगी ) कु.सद्दाम (मुलगा ) यांना जिवनात शिक्षणाचे महत्त्व समजून राष्ट्रीयहित व समाजहीत जोपासण्यासाठी एक आदर्श निर्माण केला .
त्या परिवारास सा.युवा मुस्लिम विकास परिषद आणि मीडिया डीटेक्शन डेली न्यूज़ चैनल परिवाराकडून पुढील वाटचालीस शुभेच्छा..
त्यांनी जिवनात यशस्वी व्हावे हिच अल्लाह ईश्वर चरणीं प्रार्थना.
हे यश विटा( बु ) गावावासी , शिक्षणसंस्था , प्राचार्य ,मुख्याध्यापक ,शिक्षक , नातेवाईक यांचे आशिर्वाद ,मार्गदर्शन आहेत हेच यशाचे कारण होय.
या बद्दल एका छोटेखानी कार्यक्रमात योगेश्वरी शुगरचे मँनेजींग संचालक अँड रोहित देशमुख यानी कौतुकास्पद कार्याचा सन्मान करून गौरव केला या बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे .
छायाचित्र – ग्रामीण भागातील विटा ( बु ) येथील कु.आयशा NEET मध्ये 572 तर MPSC
मध्ये उर्तीर्ण कु.सद्दाम या भाऊ व बहिनी यांचा गौरव करतांना अँड रोहित देशमुख वडील शेख उमर ..आदी मान्यवर..

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT