किरीट सोमैया यांना कोल्हापुर जिल्ह्यात नो एंट्री चे आदेश?

मुंबई

भा.ज.पा.चे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कागदपत्रे नवी दिल्लीत प्राप्तिकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाच्या उच्चपदस्थांकडे सोपविली होती.
दोन-चार आठवड्यांत याबाबत कार्यवाही अपेक्षित आहे आणि आता विदर्भातील एका मंत्र्याचा गैरव्यवहार बाहेर काढणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितले होते.
यामुळे सोमय्या यांनी आपल्याला घरातून अटक करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले असल्याचा आरोप केला आहे.
या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांच्या घरोसमोर पोलिसांचा मोठा फौज फाटा तैणात करण्यात आला आहे.
तसेच कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांकडून किरीट सोमय्या यांना नोटीस पाठवण्यात आली आहे.
ज्यामध्ये तुम्ही जिल्ह्यात येऊ नये असे सोमय्यांना सांगण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांच्या घराबाहेर मोठ्याप्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
कोल्हापूर दौरा थांबवण्यासाठी सरकारची ही दडपशाही असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. 
हसन मुश्रीफांचे घोटाळे दाबण्यासाठी हा माझ्यावर दबाव आहे.
कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत तर माझ्या मुंबईतील घराखाली येण्याची हिंमत कशी केली,
असा सवाल सोमय्या यांनी पोलिसांना केला.
तसेच मला कीतीही अडवलं तरी मी कोल्हापूरला जाणार,
असे देखील सोमय्या म्हणाले.
किरीट सोमय्या दहशतवादी आहेत का?
“किरीट सोमय्या यांच्या बंगल्यासमोर पोलीस बंदोबस्त ठेवायला ते दहशतवादी आहेत का?
भा.ज.पा.चे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडी सरकारला सवाल.
महाविकास आघाडीच्या दडपशाही, गुंड प्रवृत्तीला भा.ज.पा. घाबरणार नाही.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT