आज १४ व उद्या १५ तारीख पर्यन्त आपल्या भागासाठी अलर्ट राहण्याची का गराज आहे ? पहा खास कारण !

Screenshot_2020-10-14-21-27-47-80

प्रतिनिधी:-

उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ १५ तारखेला महाराष्ट्रात येईल.

लातूर-सोलापूर- उस्मानाबाद- परंडा-करमाळा- कर्जत- कल्याण- मुंबई मार्गे अरबी समुद्र किंवा नांदेड-परभणी-बीड-नगर- कल्याण-मुंबई-अरबी समुद्र वरीलपैकी एका मार्गाने सदरील चक्रीवादळ जाईल.
एका समुद्रातून निघालेलं वादळ भू मार्गाने वाटचाल करून दुस-या समुद्रात जाण्याची इतिहासातील ही बहुतेक पहिलीच घटना असेल.

उत्तरेकडून येणारी थंड हवा व बंगालच्या उपसागरातून अरबी समुद्राच्या दिशेने निघालेले हे चक्रीवादळ यामुळे चक्रीवादळ ज्या मार्गानं जाईल तिथं व आसपासच्या परिसरात प्रचंड वादळ व विजांच्या कडकडाटासह ढगफुटी सारखा पाऊस पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

आज दिवसभर पावसाची स्थिती अशीच राहणार आहे.
संध्याकाळी 5 दरम्यान खूप मोठा म्हणजे ढगफूटी सारखा पाऊस होईल.
कारण चक्रीवादळ उमरगा तालुका व परिसरातून प्रवास करत आहे कृपया कुणी ही घराबाहेर पडू नका अशीच परिस्थिती संध्याकाळी 7 वाजे पर्यत राहिल.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT