हि निवडणूक महत्त्वाची का आहे ? राज ठाकरे भाजपला विरोध करतायेत कारण क़ाय ?

images (29)

प्रतिनिधी:-

का पत्रकार भाजपला विरोध करताहेत? का 600 कलाकारांनी भाजप विरोधात भूमिका घेतली आहे?

देश वाचवायचा असेल तर दोन मिनिट देऊन सविस्तर वाचा.
भारत देशाच्या संविधानाने आपल्याला अनेक मूलभूत अधिकार दिलेले आहेत.
त्यापैकीच एक आहे बोलण्याचे स्वातंत्र्य.
आज पर्यंत आपण सर्व खुलेआमपणे मागील सरकार विरुद्ध बोलत होतो .
पण हे सरकार काय करतोय याकडे लक्ष द्या .
सरकारविरुद्ध बोलणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहाचे खटले भरले जात आहे माध्यमांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे.

भारतात सर्व न्यूज चॅनेल चे मालक त्यांनी खरेदी केलेत.
आणि त्यांना सरकारविरुद्ध जास्त बोलू दिले जात नाही म्हणजेच संविधानाच्या महत्त्वाच्या अधिकारावर गदा आणली जाते बोलण्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतले जात आहे !
जो सरकार विरुद्ध बोलेल त्याला देशद्रोही ठरवले जात आहे.

हि लढाई कुठल्या पक्षाविरुद्ध नाही तर लोकशाही वाचवण्यासाठी भाजप आणि आरएसएस यांच्या विचारसरणी विरुद्ध आहे.
म्हणुन आपण सावध होणे गरजेचे आहे भाजप विरोधात सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन लढण्याची गरज आहे आत्ता आपण एकत्र आलो नाही तर त्याची मोठी किंमत आपल्याला मोजावी लागेल एवढं नक्की.
भाजपचे खासदार तर म्हणतात ह्यावेळेस निवडून आलो तर परत निवडणुकाच होणार नाहित.

याचे कारणही मी तुम्हाला सांगतो की 2022 ला या सरकारकडे दोन्ही सभागृहांमध्ये बहुमत येणार आहे त्यामुळे ते नियम कायदे त्यांच्याप्रमाणे बदलू शकतात.
तुमचे सगळे अधिकार हिरावून घेऊ शकतात .
उद्या तुम्ही सरकार विरुद्ध बोलला तर तुम्हाला आर्थिक निर्बंध लावले जाऊ शकतात.
म्हणजेच तुमची बँक अकाउंट सील केली जाऊ शकतील .
कारण तुमचे अकाऊंटही आता आधार कार्ड लिंक झाली आहेत.

तुम्ही सरकारविरुद्ध बोललात तर तुमच्यावर देशद्रोहाचे खटले चालू शकतात, तुम्हाला तुरुंगात डांबले जाऊ शकते.
म्हणून अनेक पत्रकार भीती व्यक्त करत आहेत त्यापैकी मीही आहे तुम्ही ही निवडणूक सोपी समजू नका तुमच्या आमच्या अस्तित्वाची लढाई आहे.
म्हणून विशेषतः तरुणांनी भाजप विरोधी मोहिमेत सहभागी झाले पाहीजे.

न्यायव्यवस्थेवर आहे त्यांनी घाला घातला आहे त्यावर कब्जा मिळवण्याचा प्रयत्न आहे तुम्ही मला सांगा की पाच वर्षात भाजपच्या अनेक लोकांनी भ्रष्टाचार केला ,काही नेत्यांनी बलात्कार केले , लोकांचा छळ केला कुणालाही अटक झाली का?
सामान्य लोकांना न्याय कसा मिळणार जर न्यायव्यवस्था धोक्यात आली तर ?
तुम्ही लक्षात घ्या उद्या वेळ तुमच्यावर ही येऊ शकते.
चौकशीच्या धमक्या देऊन नेत्यांना विकत घेतले जात आहे
तेपण खुलेआम.चंद्रकांत पाटील या बद्दल खुलेआमपणे बोलले आहेत जे लोक ऐकत नाहीत त्यांच्यामागे चौकशा लावल्या जात आहेत !

सत्य बोलणाऱ्या पत्रकारांनाही चैनल मधून काढले जात आहे ,संपादकांना भाजप विरोधी लिखाण करू नये दबाव आणला जात आहे मग आपले प्रश्न मांडणार कोण?
म्हणून अनेक पत्रकार भाजपच्या विरोधात भूमिका घेत आहेत राज ठाकरे यांनीही हे संकट ओळखले आहे.
म्हणून ते भाजपविरुद्ध भूमिका मांडत आहेत आणि काही कलाकार ज्यांना हे जाणवतेय ते भाजपच्या विरोधात जात आहेत.

उद्या खुलेआम हे भाजपचे लोक आपल्यावर अत्याचार करतील आणि आपण काहीही करू शकणार नाही.
कारण ते अधिकारच आपल्याला शिल्लक राहणार नाहीत.
म्हणून मी सांगतो म्हणून नाही तर स्वतः विचार करा आणि ठरवा अजूनही वेळ गेली नाही,

हि निवडणूक पाहिजे एवढी सोपी नाही हे मी वारंवार सांगतोय याचा विचार करा आणि लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी आणि आपल्या अधिकार अबाधित ठेवण्यासाठी परिवर्तनात सहभागी व्हा !
आपल्यासमोर कोण उमेदवार आहे हा विचार करू नका जो भाजपचा उमेदवार आहे त्यांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करावा हाच एक उपाय आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- भारत के विदेश मंत्रालय ने इस देश के गृहमंत्री की अरुणाचल प्रदेश की यात्रा पर चीन की प्रतिक्रिया को पूरी तरह से रद्द कर...

READ MORE

उनकी मेहमाननवाजी में होगी काम की चर्चा, वो भी बिना कोई खर्चा !

February 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प और उनकी पत्नी मेलानिया ट्रम्प 24 फरवरी 2020 को दो दिवसीय दौरे पर भारत आ रहे हैं। उनके 3...

READ MORE

इस तरह दुनिया मे मोदीजी का डंका बजने में कोई कसर बाकी रह गई है क्या ?

February 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- कल श्रीलंका ने हमारे 11 मछुआरों को गिरफ्तार कर लिया ? बांग्लादेश की फ़ौज सीमा पर तार लगाने की मंजूरी नहीं दे रही है।...

READ MORE

TWEETS