संगीत खजिना खय्याम साहेब बद्दल खास काही!

मुंबई
प्रतिनिधि

महम्मद जहूर खय्याम हाश्मी यांचा जन्म भारतातील सगळ्या प्रांतामध्ये,संगीताच्या दृष्टीने अतिशय समृद्ध म्हणून अशा पंजाब प्रांतातील रोहन येथे एका पंजाबी मुस्लिम कुटुंबात झाला.
शाळेत अभ्यासात लक्ष नसलेल्या व बालपणापासूनच अभिनयाचे आकर्षण असणार्‍या खय्याम यांनी बालपणीच आपल्या दिल्लीस्थित काकाकडे पलायन केले.
काकाने प्रथम त्याला शाळेत घातले पण चित्रपटाबद्दलचे प्रेम पाहून त्याला संगीत शिकवायला सुरूवात केली. खय्याम यांनी हस्नलाल भगतराम आणि पंडित अमरनाथ या गुरूंच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले.
पण अभिनयाच्या ध्यासापोटी त्यांनी चित्रपटातील भूमिका शोधत प्रथम मुंबई नंतर लाहोर गाठले.
खय्याम यांच्याबरोबर झालेल्या पहिल्या भेटीतील त्यांच्या गाण्यावर,प्रख्यात पंजाबी संगीत दिग्दर्शक बाबा चिताश्नी खूपच प्रभावित झाले व त्यांनी त्यांना आपला सहाय्यक म्हणून घेतले.
दुसर्‍या महायुद्धानंतर खय्याम आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईला गेलेल्या खय्याम यांना श्यामजी वर्माजी या संगीतकार जोडीकडे काम करण्याची संधी मिळाली. स्वतंत्रपणे संगीत देण्याची पहिली संधी त्यांना ‘हीर रांझा ‘ या चित्रपटामुळे मिळाली.
त्यानंतर त्यांनी ‘बीवी’,’शोला और शबनम’, ‘आखरी खत ‘,’कभी कभी ‘, ‘ उमराव जान’,’ त्रिशूल’, ‘थोडीसी बेवफाई’,’दिल ए नादान’,’नुरी’,’ बाजार ‘ इत्यादी चित्रपटाना संगीत दिले.’
अकेले मे वो घबराते तो होंगे ‘ हे बिवी चित्रपटातील त्यांनी संगीत दिलेले व महम्मद रफी यांनी गायलेले पहिले गाणे जसे हीट झाले तसेच त्यांनी संगीत दिलेले,व कैफी आझमी यांनी लिहिलेली ‘शोला ओर शबनम ‘ मधील तसेच चेतन आनंद दिग्दर्शित ‘आखरी खत ‘ मधील व साहिर लुधियानवी लिखित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘कभी कभी’चित्रपटातील सर्व गाणी प्रचंड गाजली.
मोजकेच तथा सुमारे ६० चित्रपटांना खय्याम यांनी संगीत दिले. पैशाची हाव न बाळगता, मोजक्याच चित्रपटाना संगीत देणार्‍या खैय्याम यांनी आयुष्यभर आपल्या संगीताचा दर्जा टिकवून ठेवला.सी.रामचंद्र,एस.डी. बर्मन,वसंत देसाई,नौशाद, यांच्यासारख्या तालेवार संगीतकारांंच्या बरोबरीने खय्याम यांनी आपली स्वतंत्र वाट निर्माण केली.
उत्तम काव्य खय्याम यांच्या संगीतासाठी आसुसलेले असायचे त्यातूनच त्यांचे संगीत बहरत गेले.
चित्रपट संगीतात आलेल्या हार्मनीने ते विचलित झाले नाहीत पण स्वरमाधुर्याची कास धरत मात्र त्यांनी सातत्याने नवे संगीत निर्माण केले.
गजल, भजन,यांच्यासारख्या संगीतप्रकारामध्ये ते रमले. उत्तम काव्य ही त्यांची संगीताची प्राथमिक आवश्यकता होती.सुदैवाने काव्याच्या बाबतीत ते नशीबवान ठरले.
शब्द आणि संगीताचा अपूर्व संगम त्यांना साधता आला.हजारो गाणी तयार करणार्‍या संगीतकाराकडे ठेवणीतले दागिने अर्थात खास गाणी फार थोडीच असतात,पण खय्याम साहेबांचा प्रत्येक दागिना अर्थात त्यांनी संगीतबद्ध केलेले प्रत्येक गाणे,ठेवणीतल्या दागिन्यासारखेच खास गाणे ठरले.
भारतात राज्य करणार्‍या ब्रिटिशांनी पाश्र्चात्य संगीतही भारतात आणून ठेवले होते,पियानो, ॲकाॅर्डियन,व्हायोलिन,चेलो, यासारखी युरोपीयन वाद्ये भारतात आली.
त्यावरही इथल्या संगीतकारांनी कमालीचे प्रभुत्व मिळविले. हळुहळू ते संगीत चित्रपटाच्या दुनियेत येऊन पोहोचले.
भारतीय संगीत परंपरा अशा अनेक सांगीतिक आक्रमणानी सारावलेली आहे.संगीतकार खय्याम यांना पहिला संगीतकार नौशाद आली स्मृती पुरस्कार लाभला.
२०११ मध्ये भारत सरकारने तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पद्मभूषण किताब प्रदान करून त्यांना सन्मानित केले होते.
.खय्याम यांच्या पत्नीने,गायिका जगजीत कौर यांनी, नवोदित गायक,संगीतकार यांच्या मदतीसाठी “खय्याम प्रदीप जगजीत चॅरिटेबल ट्रस्ट’ नावाच्या एका ट्रस्टची स्थापना केली आहे.
या ट्रस्टच्या कार्यासाठी खय्याम यांनी आपली सर्व संपत्ती, १२ कोटी रूपये दान दिले आहेत.
उण्यापुर्‍या ९० वर्षाच्या चित्रपट संगीताच्या महाकाय राजप्रसादात खय्याम यांचे एक स्वतंत्र दालन उभे राहिले आणि ते सदासर्वदा सुरांनी उजळत राहिले.
आयुष्याशी झगडल्याशिवाय यश मिळत नाही,हे खरे ठरवणारी अनेक उदाहरणे असतानाही खय्याम हे मात्र त्याला अपवाद ठरले आहेत.ऐन तारूण्यात अगदी विशीत असतानाच संगीतकार म्हणून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली.
सात दशकांच्या या दीर्घकाळात त्यांनी स्वरांचे मोजकेच महाल उभे केले आणि त्यांच्या कर्तृत्वाने ते स्वरमानही केले.
आजचे प्रतिभावंत संगीतकार, आपल्या संगीताने, केवळ, चित्रपटाच्या कथेची गरज पूर्ण करत आहेत. त्यामुळे आजही जुनी गाणी,जुने संगीत यांचा वारंवार उल्लेख केला जातो, त्याच जुन्या गाण्यांचे,जुन्या संगीताचे पुन्हा दिवस येतील असा आशा आशावाद अनेक मुलाखतीत व्यक्त करणारे ” संगीतकार खय्याम नव्वदीपर्यत संपन्न जीवन जगले.
त्यांचे १९ ऑगस्ट २०१९ रोजी वयाच्या ९२ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यामुळे संगीत क्षेत्रासाठी खूपच दुःखदायी घटना ठरली.
खय्यामसाहेब आज या जगात नसतील पण त्यांचे संगीत आणि त्यांच्या आठवणी नेहमीच आपल्या सर्वासोबत असतील हे मात्र तितकेच खरे!
प्रख्यात संगीतकार खय्याम यांचा उलगडून दाखवलेला हा जीवनपट खरोखरच उल्लेखनीय व संगीत क्षेत्रात पदार्पण करू इच्छिणार्‍या भावीपीढीला प्रेरणा देणारा ठरतो.

साभार: अरूण दीक्षित.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

एडमिन अमेरिका के साथ गहराते रिश्‍ते के बीच बाइडन प्रशासन ने एक बार फिर से भारत को रूसी रक्षा प्रणाली एस-400 को लेकर कड़ी चेतावनी...

READ MORE

क्या अमेरिका दिवालिया होने की कागरपार पहुंच गया है? क्या है पूरा मामला ?

October 7, 2021 . by admin

एडमिन अगर अमेरिकी कांग्रेस ने पहले से लिये गये लगभग 3-ट्रैलियन डॉलर पर इस साल का बक़ाया लगभग 378-अरब डॉलर का ब्याज़ अदा नहीं किया...

READ MORE

एक थे फिनलैंड के एक बहाद्दूर योद्धा फौजी सिमो हयहा, जिन्हे सोवियत की सेना व्हाइट डेथ यानी सफेद मौत के नाम से जानती थी

October 6, 2021 . by admin

एडमिन क्या कोई एक फौजी इतना तगड़ा योद्धा हो सकता है कि वो अपने देश की आर्मी से हज़ारों गुना ताकतवर आर्मी को अकेले रोक...

READ MORE

TWEETS