शिव सेनेत अचानक ढग फूटी का घडली मुख्य सूत्र धार एकनाथ शिंदे की दूसरा कोण?

शिवसेनेच्या बंडाचा खरा सुत्रधार एकनाथ शिंदे नाही तर शंभुराज देसाई!

वास्तविक पाहता हे महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी, सरकारच्या पहिल्या दिवसापासूनच फडणवीस आणि भाजपचे अनेक प्रयत्न चालू होते. ईडी व केंद्रातील अनेक यंत्रणांना घरगड्यासारखं भाजपाने महाराष्ट्रात कामाला लावले होते. साम-दाम-दंड-भेद वापरुन काहीही करुन महाराष्ट्रात आपलं सरकार आणायंच हेच ध्येय भाजपाचे होते. सरकार पाडण्यासाठी अनेक प्लॅन केले गेले.

प्रत्येक प्लॅन नंतर भाजपा नेते सरकार पडणार म्हणून भविष्यवाणी करत होते. परंतु २ वर्षे झाली तरी भाजपा सरकार पाडण्यात यश आले नाही. मग भाजपाने शेवटचा पर्याय हाती घेतला तो म्हणजे, आमदार फोडून बहुमताचा जादुई आकडा गाठायचा. त्यासाठी त्यांना अगोदर महाविकास आघाडीतील कोणत्याही एका पक्षाचे किमान २/३ आमदार फोडायला लागणार होते.

२५ वर्षे सेनेसोबत युतीत राहिल्याने भाजपा नेत्यांना सेनेच्या अनेक बड्या नेत्यांची अंडी-पिल्ली माहित होती. शिवाय सेनेत अंतर्गत गटबाजी किंवा बड्या नेत्यांचे वेगवेगळे गटही नव्हते, याचे कारण म्हणजे मातोश्रीच्या आदेशानुसार चालण्याची शिवसैनिकांची पद्धत. शिवाय ज्यांचे गट होते ते नारायण राणे, राज ठाकरे, छगन भुजबळ कधीच सेना सोडून बाहेर पडले होते. त्यामुळे सेनेतील विखुरलेल्या आमदारांना गळाला लावणे अगदी सोपं आहे हे भाजपाने ओळखले.

पण हे वाटतं तितकं सोपं नव्हतं, एकनिष्ठ शिवसैनिक आमदार फोडण सहज शक्य होणारी गोष्ट नव्हती. आता भाजपाला गरज होती एका अशा हेराची जो सेनेत राहून सेनेच्याच गोटातील, मंत्रीमंडळातील सर्व माहिती पूरवेल व तो एकदम विश्वासूही असेल आणि भाजपाचा तो हेर म्हणजे पाटणचे आमदार शंभूराज देसाई जे मंत्रीमंडळातही गृहराज्यमंत्री म्हणून होते शिवाय सेनेच्या अनेक बड्या नेत्यांशी त्यांचे चांगले संबंधही होते. तुम्हीं म्हणाल शंभुराज देसाईच का ? तर त्याचे पहिले कारण म्हणजे शंभुराज देसाई हे काही कट्टर शिवसैनिक नाहीत, निवडणूकीपूरते सेनेचे चिन्हं वा़परतात. निवडणूकीनंतर ते देसाई गट म्हणून मतदारसंघात वावरत असतात.

आजपर्यंत देसाई सेनेच्या तिकीटावर ३ वेळा आमदार झाले परंतु सेना वाढवण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न शुन्यच म्हणावे लागतील. पाटण मतदारसंघात सेनेचा वेगळा गट कार्यरत आहे जो सेनेशी सदैव एकनिष्ठ आहे. हा गट गेली अनेक वर्षे देसाई यांच्या विरोधात तक्रारही करत होता परंतू सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी वेळोवेळी याकडे दुर्लक्ष केले.

देसाई यांनी सेनेचा हा एकनिष्ठ गट आपल्या मतदारसंघातून कसे संपेल याची पूर्ण तजवीज वेळोवेळी केली. प्रत्येक निवडणुकीत या शिवसेना एकनिष्ठ गटाचे उमेदवार पाडून, त्यांची राजकीय गळचेपी करुन शिवसेना आपल्या मतदारसंघात रुजणार नाही, वाढणार नाही व आपल्याला डोईजड होणार नाही याची देसाई यांनी पूर्णपणे खबरदारी घेतली. देसाई यांनी या सेना एकनिष्ठ गटा विरोधात एवढं करुनही या बिचाऱ्या शिवसैनिकांना मातोश्रीच्या आदेशामुळे विधानसभेला या देसाईंनाच मतदान करावे लागत होते.

थोडक्यात काय तर शंभुराज देसाई यांना सेनेविषयी कोणत्याही प्रकारची आत्मियता नव्हती. दुसरे कारण म्हणजे शंभुराज देसाई यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याशी असलेले सलोख्याचे संबंध. देसाई आणि फडणवीसांच्या मैत्रीचे किस्से तर तुम्हीं ऐकले असतीलच. याच देसाईंच्या मतदारसंघात फडणवीसांच येणं-जाणंही होतं. जर २०१९ ला भाजपा-सेना युतीने एकत्रीत निवडणूक लढवली नसती तर कदाचित देसाईंनी भाजपात प्रवेश केला असता, एवढी त्यांची मैत्री घनिष्ठ आहे. देसाई सेनेतील अंतर्गत माहिती, मतभेदांची कल्पना फडणवीसांना वेळोवळी देत राहिले. देसाई यांच्या या गुप्त माहितीच्या आधारेच सेनेतील अनेक नेत्यांच्याभोवती ईडीचा फास आवळला गेला.

याचा मुख्य हेतू होता सेनीतील आमदारांमध्ये भितीचे वातावरण निर्माण करणे‌. ईडीच्या कारावाईच्या भितीमुळे सेनेतील अनेक आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली. सेनेत उध्दव ठाकरेंनंतर ज्यांचा शब्द प्रमाण मानला जातो असे नेते म्हणजे एकनाथ शिंदे. काही महिन्यांपूर्वी शिंदे आणि अदित्य ठाकरे यांच्यात खडाजंगी झाली ही बातमी आली होती. त्यामुळे उध्दव ठाकरेही शिंदेवर नाराज झाल्याचे समजत होते. या सर्व घटनांमुळे शिंदेही पक्षनेतृत्वावर नाराज झाले होते. ही माहिती भाजपा गोटात पोहचली आणि हिच ती सेना फोडण्यासाठी योग्य वेळ आहे हे ओळखून, काही दिवसांपूर्वी शिंदेंवर ईडीचा डाव टाकला गेला. कसा आणि कुठे डाव टाकायचा ही माहिती अगोदरच पोहच केली गेली होती.

अपेक्षेप्रमाणे पक्षातील मतभेद आणि ईडीच्या कारावाईची धास्ती यामुळे शिंदे अस्वस्थ झाले. या परिस्थितीचा फायदा उठवून शंभुराज देसाई यांनी सेनेत राहून तुमचा अपमान, गळचेपी करुन घेण्यापेक्षा, आपलं भाजपासोबत जाणं कसं योग्य आहे हे पटवून दिले. मुख्यमंत्री पदी तुम्हीं आणि शिवाय ईडीचा कोणताही धोका नाही ही सेटलमेंट ठरली. परिस्थितीच अशी निर्माण केली गेली की शिंदेही बरोबर जाळ्यात अडकले. राज्यसभा मतदानावेळी सर्व सेनेचे आमदार एकत्र येणार असल्याने तोच मुहूर्त ठरला.

मतदान झाल्यानंतर सेना आमदारांना शिंदेंनी आपण जेवायला बाहेर जायचे सांगून गाडी सुरतच्या दिशेने वळवली. या बंडखोरीची कल्पना सेनेतील बहुतांश आमदारांना प्लॅन बाहेर येऊ नये म्हणून अगोदर देण्यात आली नव्हती. सुरतमध्ये गेल्यानंतर या आमदारांना हा प्लॅन पटवून देण्यात आला. त्यामुळेच कैलास पाटील या आमदाराला घाबरून मुंबईत पळून यावे लागले कारण पाटील यांना काहीच कल्पना नव्हती काय चाललंय याची. सर्व बंडखोर आमदारांना प्लॅन पटवून देण्यासाठी फडणवीस, शहा यांच्याशीही संपर्क करुन देण्यात आला, सर्व ऑफर दिल्या गेल्या.

महाराष्ट्रात मागे राहीलेल्या एकनिष्ठ अगदी ठाकरे कुटुंबाशी घनिष्ठ संबंध असलेल्या आमदारांना ही ऑफर समजल्यानंतर ते पक्ष,निष्ठा, जनतेच्या भावना पायदळी तुडवून सुरत, गुहाटीला पोहचले. मग विचार करा कसली भक्कम ऑफर असेल ? या सर्व आमदारांचे जराही मतपरिवर्तन होऊ नये म्हणून त्यांची राजेशाही थाटात काळजी घेतली गेली. त्यानंतर काय घडलं हे मी सांगायची गरज नाही. आज महाराष्ट्रातील तमाम जनता, सच्चा शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना शिव्याशाप देत आहे, गद्दार म्हणत आहे पण खरा सुत्रधार वेगळाच होता आणि दुर्दैव म्हणजे सेनेने स्वतः त्या सुत्रधाराला वाढवलं, मोठं केलं होतं. यालाच तर फडणवीस नीती म्हणतात.
संवाद

-सदाशिव नवलेकर

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

अफजल इलाहाबाद क्या आप जानतें हैं कि विश्व बैंक के मालिक सिर्फ़ 13 परिवार हैं ? जी हां विश्व बैंक सरकारी बैंक नहीं है, इसमें...

READ MORE

मिडल ईस्ट में ये एक पिद्दी सा देश है 15,20साल पहले इसकी कोई अहमियत नहीं थी अचानक ही दुनिया के सामने वो धूमकेतु की तरह उभर ,दूजिया का मीडिया हाउस बना ,कैसे इसे जानिए

June 8, 2022 . by admin

संवाददाता राशिद मोहमद खान मिडिल ईस्ट में एक मामूली सा देश है-कतर पन्द्रह बीस साल पहले इसकी कोई अहमियत नहीं थी। इसके बाद अचानक से...

READ MORE

जापान ,भारत समेत 11देशों को मिसाइल और जेट जैसे घातक सैन्य उपकरणों के निर्यात की इजाजत देने की बना रहा है योजना

May 28, 2022 . by admin

डॉक्टर अरूण कुमार मिश्र जापान भारत समेत ग्यारह देशों को मिसाइल और जेट – घातक सैन्य उपकरणों के निर्यात की अनुमति देने की बना रहा...

READ MORE

TWEETS