शिवसेनेला 5 वर्ष मुख्यमंत्रिपद जवळपास निश्चित, पण क़ाय असेल 14-14-12 मंत्रिपदाचा फॉर्म्युला? पाहा सविस्तर !

images (63)

मुंबई : महाराष्ट्रात महासेनाआघाडीचं सरकार स्थापन होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या महासेनाआघाडीच्या पहिल्या समन्वय बैठकीत खातेवाटपांवर चर्चा झाली.
तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची काल पहिली समन्वय बैठक पार पडली.
या बैठकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सत्तास्थापनेसाठी आवश्यक किमान समान कार्यक्रमाचा मसूदा तयार केला आहे.
महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसने मुख्यमंत्रिपदाची भूमिका जाहीर केली आहे.
मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडेच असेल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी वारंवार सांगितलं आहे.
मात्र अन्य मंत्रिपदांची वाटणी कशी करायची याबाबत समन्वय बैठकीत चर्चा झाली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तीनही पक्षांनी 14-14-12 असं मंत्रिपदाचं सूत्र ठरवल्याची माहिती आहे.
त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्रिपद हे पाचही वर्ष शिवसेनेकडेच असेल,
तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एक-एक उपमुख्यमंत्रिपद असेल, असंही सांगण्यात येत आहे.

14-14-12 मंत्रिपदाचा फॉर्म्युला !

दरम्यान, तीनही पक्षांच्या समन्वय समितीच्या बैठकीत किमान समान कार्यक्रमावर चर्चा झाली.
याशिवाय तयार केलेल्या मसुद्यात शिवसेनेला पूर्णकाळ मुख्यमंत्रिपद देण्याची तयारी आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एक-एक उपमुख्यमंत्री असतील.
सध्या चर्चेत असलेल्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह 14 मंत्रिपदे, राष्ट्रवादीला 14 आणि काँग्रेसला 12 मंत्रिपदे मिळण्याचे संकेत आहेत. दोन्ही पक्षांना उपमुख्यमंत्रिपदेही मिळतील.

महत्त्वाची खाती सर्वांच्या वाट्याला

महत्वाची चार खाती प्रत्येक पक्षाला वाटून देण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागाशी संबंधित खाती प्रत्येकी एका पक्षाच्या वाट्याला येऊ शकतात. त्यानुसार गृह, अर्थ, उद्योग एका पक्षाकडे असण्याची शक्यता आहे.
तर महसूल, सार्वजनिक बांधकाम आणि ऊर्जा दुसऱ्या पक्षाकडे असण्याची शक्यता आहे.
नगरविकास, जलसंपदा, MSRDC तिसऱ्या पक्षाला दिलं जाण्याची चिन्हं आहेत.
तर ग्रामीण भागाची कृषी, सहकार, ग्रामविकास ही खाती प्रत्येकी एका पक्षाला मिळू शकतात.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

नई दिल्ली:- राज्यसभा ने शस्त्र अधिनियम 1959 में संशोधन के लिए शस्त्र अधिनियम (संशोधन) विधेयक 2019 पारित किया। इसे पहले लोकसभा ने सोमवार को मंजूरी...

READ MORE

अगली बार रेलयात्रियों के लिए क्यों अच्छी खबर नही है ? जाने !

December 12, 2019 . by admin

रिपोर्टर:- रेल में सफर करना और महंगा होने जा रहा है। भारतीय रेलवे (Indian Railway) जल्द ही यात्री किराये में बढ़ोतरी कर सकता है। खबर...

READ MORE

दिन भर चली चर्चा के बाद देर रात पास हुआ नागरिकता (संशोधन) बिल, उक्त बिल में मुस्लिमो पर केंद्र सरकार का रवैय्या सवालों के घेरे में ?

December 10, 2019 . by admin

रिपोर्टर:- पक्ष में पड़े 311 मत तो विरोध में मात्र 80, कांग्रेस ने किया बिल का विरोध ! बहुचर्चित नागरिकता संशोधन बिल को अंततः दिन...

READ MORE

TWEETS