रेशन दुकान उघडे नसल्यास दुकानदारावर हाेणार कारवाई. कारण क़ाय ?

download

प्रतिनिधी:-

रेशन दुकानात धान्य आल्यानंतर काही दिवस धान्य वाटायचे आणि नंतर महिनाभर दुकान बंद ठेवणाऱ्या रेशन दुकानदारांना ही युक्ती आता महागात पडणार आहे.
कारण असे करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.

यामुळे महिनाभरात कधीही धान्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी रेशन दुकानदारांची असणार आहे.
शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने यासंबंधी एक परिपत्रक जारी केले आहे.

महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत लोकांना धान्य उपलब्ध करून देण्याची सक्ती करून महिनाभर धान्य उपलब्ध करून देण्याची जबाबदारी दुकानदारांवर टाकावी,
अशी मागणी काही आमदारांनी विधानसभेत केली होती.
या मागणीनुसार शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने एक परिपत्रक जारी केले आहे.
या परिपत्रकात म्हटले आहे की, लाभार्थी महिन्यातील कोणत्याही दिवशी आल्यास धान्य उपलब्ध करून देणे संबंधित रेशन दुकानदाराला बंधनकारक असेल.
असे न केल्यास दुकानदाराला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

त्यामुळे एखाद्या रेशन शिधापत्रिकाधारकाने तक्रार केल्यास संबंधित दुकानदाराला कारवाईस सामोरे जावे लागणार आहे!

आदेश काढायला लागले दोन वर्षे सन २०१७ च्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात चर्चा सुरू असताना आमदार शिवाजीराव नाईक यांनी महिन्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत धान्य उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती. त्यानंतर १३ जून २०१९ रोजी हा आदेश निघाला आहे !

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

मुंबई:-मेहमूद शेख. मामला ओशिवरा पुलिस के अंतर्गत आनेवाली ‘नमर्दा अपार्टमेंट बिल्डिंग’ के फ्लैट न. ३३१ का है ! जहाँ दि. २२ जुलाई को तकरीबन रात...

READ MORE

धोनीच्या क्रिकेटमधून निवृत्तीबाबत धोनीच्या मॅनेजरचं क़ाय वक्तव्य आहे ? पाहा !

July 21, 2019 . by admin

प्रतिनिधि. धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे ! भारताचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. वर्ल्डकपनंतर...

READ MORE

पृथ्वी की वह कौनसी 9 प्रकार की जानकारिया है ? जानिए !

July 21, 2019 . by admin

रिपोर्टर:- दो लिंग : नर और नारी । दो पक्ष : शुक्ल पक्ष और कृष्ण पक्ष। दो पूजा : वैदिकी और तांत्रिकी (पुराणोक्त)। दो अयन...

READ MORE

TWEETS