मुम्बई शहरात कोरोना ची डोक दुखीराज्य प्रशासन ने लागू केली धारा 144 !

images

मुंबई : शहरात कोरोनाने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे.

मुंबईत वाढत्या रुग्णसंख्येमुळं प्रशासनानं कडक पावलं उचलली आहेत.

मुंबईत आज मध्यरात्री 18,सप्टेंबरपासून कलम 144 लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून या संदर्भात आदेश काढण्यात आले आहेत.
त्यामुळे प्रवासासह एकत्र येण्यावर निर्बंध आले आहेत.
मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 लागू राहणार आहे
अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांना या दरम्यान प्रवासाची मुभा असणार आहे.

मात्र, त्यांना देखील फिजिकल डिस्टन्स ठेवणे, कमीत कमी सहा फुटांचे अंतर ठेवणे गरजेचे असल्याचं म्हटलं आहे.
केवळ अत्यावश्यक काम असेल तरचं घराबाहेर पडावे.
घराबाहेर फिरताना चेहऱ्यावर मास्क अनिवार्य आहे.
सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे.

वरील नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल.
राज्य सरकार टप्प्या टप्प्याने राज्यातील निर्बंध शिथील करत आहे.
एकप्रकारे राज्यातील व्यवहार सुरळित करण्याचा हा प्रयत्न आहे.
मात्र, वाढत्या रुग्णसंख्येमुळे पुन्हा नियम कडक करण्यात आले आहेत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT