महावितरण चे प्रति महीने वाढ़ते बिल पाहून किरीट सोमैया यानी राज्य सरकार विरूद्ध काय सांगुन टीका केली ?

images (51)

रिपोर्टर:-

महावितरणला 20 हजार कोटी रुपयांची गरज असल्याने वीजबिलांचा घोटाळा !

महावितरण चालवण्यासाठी राज्याला 20 हजार कोटी रुपयांची गरज होती.

ते उभे करण्यासाठी मंत्रालयात एक कट शिजला आणि राज्यातील वीज ग्राहकाला त्यांनी वाढीव बिलं पाठवली,
असा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.

या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महावितरणचा काला चिठ्ठा या मोहिमेची सुरुवातही करण्यात आली.
या वेळी बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, आम्ही राज्यातील 20 ठिकाणांहुन प्रातिनिधिक स्वरूपात 100 बिले एक नमूना म्हणून आणली आहेत.
या वीजबिलांचा आम्ही बारीक अभ्यासही केलाय. लॉकडाऊनमध्ये वीजदर कमी करायला पाहिजे. मात्र, त्यांनी 20 टाके वाढवले आहे.

राज्य सरकार लोकांची दिशाभूल करुन लूट करत आहेत.
हे सरकार लोकांना मूर्ख बनवत आहे. सरासरी बिलं द्यायची हा या सरकारचा घोषित केलेला निर्णय होता.
मात्र, प्रत्येक्षात वेगळेच आहे. 3 ते 10 पट बिलं काढली आहेत.
हे हप्ते खाऊ सरकार लोकांना हप्त्याने बिल भरा म्हणते, असं किरीट सोमय्या म्हणाले.
महावितरणकडे कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला पैसे नाहीत, वीज खरेदी करायला पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी असं कारस्थान रचले.

राज्यात 1 लाख ग्राहकांना अशी बिले पाठवलीत.
जिथं बिल दुप्पट पेक्षा जास्त आहेत. अश्या 40 हजार तक्रारी आल्या आहेत. आम्ही हजारो बिले जमा केली आहेत.
ही बिलं राज्यपाल यांना पाठवणार आहे. महावितरण सोबत बेस्ट, अदानी, टाटा यांनी पण जर वाढीव बिल पाठवली असतील तर त्यांनाही जाब विचारणार असल्याचे सोमय्या म्हणाले. महावितरणने अशी बिलं का पाठवली?
असा प्रश्न करत जुलै मधील बिलं मागे घेण्याची मागणी केलीय.

मात्र, ही बिलं मागे घेण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारचा नाही.
राज्य सरकारने परत जुलै महिन्यात आलेली बिले मागे घ्यावीत, अशी मागणी आम्ही केली असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले.
या वेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले,महावितरणच्या बिलांचा हा घोटाळा आहे.
गेल्या 8 महिन्यात जमलं तर ढकलून पाहू असे सरकार आहे.
अनेक गोष्टी सरकार जमल्या तर करते, नाही तर ढकलते.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर :- सुपरस्टार रजनीकांत समेत 25 बड़ी फिल्मी हस्तियों को पत्र लिखकर बुलाया गया है और फिल्म सिटी बनाने के लिए सुझाव मांगे गए हैं। यूपी...

READ MORE

मंत्री जी  पी नार्थ मनपा में रिश्वत खोरी है बेलगाम, तो क्यों ना चिरकुट और फर्जी ठेकेदार सदा कांटत है चांदी ?

September 22, 2020 . by admin

रिपोर्टर;- बीते एक महीने पूर्व से शिकायत करते चिल्ला रहे है कि पी नार्थ मनपा प्रशासन कथित ही बेसुध और लापरवाह है । बताया जाता...

READ MORE

एक तरफ लॉक डाउन तो दूसरी ओर आर्थिक तंगदस्ती के कारण देदी जान ?कौन और कहा की है ये दर्दभरी दास्तां ?जाने !

September 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- आर्थिक तंगी के चलते अमीनाबाद के पटरी दुकानदार ने जहर खाकर दी जान। अमीनाबाद में लॉक डाउन के चलते अमीनाबाद में पटरी दुकानदारों के...

READ MORE

TWEETS