पाहा केळीच्या पानावर जेवण करण्यामागचे कारण?

IMG-20170728-WA0206

प्रतिनिधि.

हिंदू धर्म ग्रंथामध्ये केळीच्या झाडाला पवित्र मानण्यात आले आहे.

याच कारणामुळे या झाडाची पूजा केली जाते. काही विशेष पूजन कर्मामध्ये या झाडाच्या पानांचा मंडपही तयार केला जातो.

हे झाड भगवान विष्णूला प्रिय आहे. यामुळे ज्या लोकांचे लग्न जमण्यास उशीर होत आहे त्यांना या झाडाची पूजा करण्यास सांगितले जाते.
वास्तुनुसार केळीचे झाड घराच्या समोर किंवा बागेमध्ये लावणे शुभ मानले जाते.हिन्दू धर्मात ही प्रथा आहे.

भारतातील काही भागांमध्ये या झाडाच्या पवित्रतेमुळे याचा उपयोग जेवण करण्यासाठी केला जातो.
यामागे सुद्धा धार्मिक तसेच वैज्ञानिक कारण आहे.

आम्ही तुम्हाला केळीच्या पानांवर जेवण केल्याने कोणकोणते फायदे होतात या संदर्भात माहिती देत आहोत
केळीच्या पानांमधून मिळणारे फायबर चटई, जाड पेपर, पेपर पल्प बनवण्यासाठी उपयोगात आणले जाते.

केळीच्या पानांवर गरम जेवण वाढल्याने त्या पानांमध्ये असलेले पोषक तत्व अन्नात मिसळतात, जे शरीरासाठी चांगले असतात.
केळीच्या पानांवर जेवण केल्यास डाग-खाज, पुरळ-फोडं अशा समस्या दूर होतात.

केळीच्या पानामध्ये अधिक प्रमाणात एपिगालोकेटचीन गलेट आणि इजीसीजी सारखे पॉलीफिनोल्स एंटीऑक्सीडेंट आढळतात.

या पानावर जेवण केल्यास हे एंटीऑक्सीडेंट आपल्या शरीराला मिळतात. हे एंटीऑक्सीडेंट त्वचेला दीर्घ काळापर्यंत तरुण ठेवण्यास मदत करतात!

त्वचेवर पुरळ, डाग, मुरूम असतील तर केळीच्या पानावर खोबरेल तेल टाकून हे पान त्वचेवर गुंडाळल्यास त्वचेचे आजार लवकर ठीक होतात?

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

Recent Posts