तो काल पर्यंत शेकडों लोकांची अंत्यविधी,कफन दफन करणारा अवलिया आज अचानक कुट्ठे गेला ?

IMG-20191012-WA0139

प्रतिनिधी:-

इचलकरंजी परिसरात मुस्लिम समाजात कोणत्याही ठिकाणी जरी मयत झाली अशी बातमी आली तर लगेच लोकांचे फोन अय्याज भाई कडे जाणार व अय्याज मिस्त्री यांना फोन करणार,कुठं आहे अय्याज भाई ?
अस जरी कुणी म्हटलं तर लगेच समोरून उत्तर ठरलेलं पाच मिनिटात आलो.
अश्या शेकडों मुस्लिम समाजातील मयतिचं कफन,दफन,अंत्यविधी पार पाडणारा अय्याज मिस्त्री आज जगाचा निरोप घेतला.
अतिशय दुःखद व मनाला चटका लावणारी घटना आज इचलकरंजी शहरात घडली.

सकाळी सकाळी बातमी आल्यावर एका महाशयांनी मला सांगितले कुणी तरी अय्याज नावाची इसम मयत झाली तो महाशय म्हणाला लगेच अय्याज भाई ला फोन लावा त्याला सांगितलं की हाच अय्याज भाई हो, सांगण्याचं तात्पर्य की लोकांच्या गळ्यातील ताईत प्रमाणे त्याची वागणूक होती.
फक्त कफन,दफन नाही संपूर्ण जियारत विधी आवरून च हा गडी जागा सोडायचा.
आज अय्याज भाई स्वतः अचानक असा गेल्याने शहरात एक शोककळा पसरली आहे.

त्याच्या मुलीचं पुढील महिन्यात लग्न आहे मुलगा कॉलेज शिक्षण घेत आहे फार मोठी जबाबदारी घरातील लोकांवर आली आहे ,परिस्थिती अतिशय बिकट आहे तरी एक विनंती असेल की अय्याज भाई जस आपल्या सुख दुःखात असल्याचं तस आपण समाज म्हणून त्याच्या घराची जबाबदारी स्वीकारावी.

आय.जी.एम मध्ये आत्महत्या,बेवारस,किंवा संशयास्पद मयत आली की लगेच अय्याज भाई ला बोलवायचे की तुम्ही याची कफन ,दफन आवरून द्या हा महाशय लगेच आलो म्हणून सर्व विधी आवरून मयत तयार करून नातेवाईकांच्या ताब्यात द्याचा.
शेकडों लोकांची कफन,दफन,अंत्यविधी करणारा अवलिया आज स्वतः च्या कफन मध्ये झोपला आहे म्हणून अंतकरणातून डोळ्यातून अश्रू चा बांध फुटत आहे.
अल्लाह चरणी प्रार्थना आहे की अय्याज भाई ची मागफिरत होऊ व जन्नत मध्ये त्याला कायमची जागा मिळो,व त्याच्या मित्रांना,कुटुंबियांना धीर मिळो हीच प्रार्थना असेल.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- भारत के विदेश मंत्रालय ने इस देश के गृहमंत्री की अरुणाचल प्रदेश की यात्रा पर चीन की प्रतिक्रिया को पूरी तरह से रद्द कर...

READ MORE

उनकी मेहमाननवाजी में होगी काम की चर्चा, वो भी बिना कोई खर्चा !

February 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- अमेरिका के राष्ट्रपति डोनाल्ड ट्रम्प और उनकी पत्नी मेलानिया ट्रम्प 24 फरवरी 2020 को दो दिवसीय दौरे पर भारत आ रहे हैं। उनके 3...

READ MORE

इस तरह दुनिया मे मोदीजी का डंका बजने में कोई कसर बाकी रह गई है क्या ?

February 22, 2020 . by admin

रिपोर्टर:- कल श्रीलंका ने हमारे 11 मछुआरों को गिरफ्तार कर लिया ? बांग्लादेश की फ़ौज सीमा पर तार लगाने की मंजूरी नहीं दे रही है।...

READ MORE

TWEETS