ट्रेजेडी किंग महान अभिनेता दिलीप कुमार यांचे९८ वर्षांत पदार्पण,त्यांच्या आज वाढ़ दीवसा निमित्त काय आहे खास ? वाचा !

IMG-20201211-WA0062

मुंबई -रिपोर्टर.
ट्रॅजिडी किंग म्हणून ओळख असलेल्या महान अभिनेते दिलिप कुमार यांचा वाढदिवस.
त्यांनी नुकतेच 98 व्या वर्षात पदार्पण केले आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीत आपल्या अभिनयानं वेगळा ठसा उमटविणा-या दिलिप कुमार यांचे भारतीय चित्रपटाला असलेलं योगदान विसरता येणार नाही.
चार दशकांहून अधिक काळ त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले.

त्यांना अविस्मरणीय आनंद दिला.
त्यांच्या चित्रपटातील काही डायलॉग अद्याप प्रेक्षकांच्या स्मरणात आहे.
एकविसाव्या शतकातल्या तरुणाईलाही दिलिप कुमार यांच्या त्या अनोख्या शैलीतील संवादानं भुरळ घातली आहे.
असे म्हटले जाते की, देशातील पहिले मेथड एक्टर म्हणून दिलिप कुमार यांचे नाव घेतले जाते.
ते त्यांच्या भूमिकेसाठी इतकी मेहनत घेत असत की, काही वेळा त्यांना त्या भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागला.
अशा चित्रपटांची उदाहरणे द्यायची झाल्यास मुघल ए आझम, देवदास, नया दौर आणि सौदागर ही नावे घेता येतील.

दिलीप कुमार यांच्या अशा काही चित्रपटांतील प्रसिध्द डायलॉग आपण पाहुया,
नया दौर – तुम्हारा धर्म तो पैसा है कुंदन बाबु पैसा, मगर हम दया के भिकारी नही है,
क्रांती – जब जिंदगी दौडती है, तो रगो में बहता खून भी दौडता है।
कर्मा – इंसान जब अंधा हो जाता है, तो उसको रात और दिन के फर्क में तमीज नही रहती।
सौदागर – हक हमेशा सर झुका के नही, सर उठा के मांगा जाता है।

देवदास – कौन कमबख्त बरदाश करने के लिए को पिता है, मैं तो पिता हुँ की बस सास ले सकु
लिडर – जीत इनकी नही होगी जीत जनता की होगी, जीत इस झुठ की नही होगी, जीत सच्चाई की होगी।
मुघल ए आझम – मोहब्बत जो डरती है वो मोहब्बत नही, अय्य़ाशी है, गुनाह है।
मोहब्बत हमने माना जिंदगी बरबाद करती है, ये क्या काम है कि मर जाने पे दुनिया याद करती है।

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT