जेव्हां रिबेरो हे महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक ( DGP) होते, त्यांनी अतिशय स्पष्ट शब्दांमध्ये मोदींना क़ाय सुनावलं आहे ? ते जाणून घ्या !

images (50)

प्रतिनिधी:- 

महाराष्ट्राचे माजी पोलिस डीजीपी रिबेरो यानी
इतक्या परखड उदाहरणांनी पटवून दिलाय की आत्ता ज्या डिजिटल तंत्रज्ञानाचा गैरफायदा घेऊन तुम्ही जिंकता आहात आणि भर सभेत काँग्रेस ने काय केलं म्हणून प्रश्न विचारताय,
पण हे तंत्रज्ञान सुद्धा काँग्रेस च्याच काळात आलेलं आहे.
श्रीयुत रिबेरो च्या इंग्रजी वक्तव्याचा ढोबळ मराठी अनुवाद –

1947 च्या आधी 200 वर्षे पारतंत्र्यात असलेल्या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर झीरो पासून सुरुवास्त करावी लागली.
भारताकडे एक टाचणी निर्माण करता येईल एवढी देखील साधन सामुग्री नव्हती,
इलेक्ट्रिसीटी ही अकख्या भारतामध्ये फक्त 20 गावांना होती, फोन सुविधा फक्त 20 संस्थानिकांकडे होती,
पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नव्हता, फक्त 10 छोटी धरणं होती, हॉस्पिटल्स, शिक्षण संस्था नव्हत्या, खते, गोखाद्य, जलसंधारण यातलं काहीही नव्हतं.. बालमृत्यूचा दर अफाट होता.
अतिशय कमी मिलिटरी स्टाफ बॉर्डरवर होता.
देशाच्या सगळ्या सीमा खुल्या आणि असुरक्षित होत्या, आणि जवळ होती फक्त 4 विमानं आणि 20 रणगाडे !
रस्ते आणि पूल नव्हते, तिजोरीत खडखडाट होता.
या अवस्थेमध्ये नेहेरू सत्तेवर आले आणि आज 60 वर्षांनंतर आपण भारत देश म्हणून कुठल्या कुठे आलो आहोत !

जगातली दुसऱ्या नंबरवरची आर्मी, हजारो वॉर प्लेन्स, टॅन्कस, मिसाईल्स, कैक प्रकारच्या गन्स, लाखो औद्योगिक संस्था, जवळ जवळ प्रत्येक खेड्यात वीज, शेकडो इलेक्ट्रिक पॉवर स्टेशन्स, लाखो किलोमीटरचे नॅशनल हायवेज आणि ओव्हर ब्रिजेस.
नवीन रेल्वे प्रोजेक्ट्स, स्टेडियम्स, सुपर स्पेशिअलिटी हॉस्पिटल्स, जवळ जवळ घरटी tv सेट्स, फोन्स, मोबाईल्स प्रत्येक देशवासियांना उपलब्ध आहेत.
सर्व प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर (पायाभूत सुविधा) की ज्यामुळे देशात आणि देशाबाहेरही काम करण्याच्या संधी, बँका, युनिव्हर्सिटीज, AIMS, IITS, IIMS, न्यूक्लिअर वेपन्स, सबमरिन्स(पाणबुड्या), न्यूक्लिअर स्टेशन्स, ISRO (इसरो) , नवरत्न पब्लिक सेक्टर युनिट्स.
इंडियन आर्मी ने लाहोर पर्यंत मारलेली धडक,
पाकिस्तान चे केलेले 2 तुकडे ( बांगलादेशची निर्मिती) , 1 लाख पाकी सैन्याने आणि कमांडरांना पत्करायला लावलेली शरणागती ??

भारताने खनिजांची आणि धान्याची सुरू केलेली निर्यात, इंदिराजींनी केलेले बँकांचे राष्ट्रीयीकरण ?
कॉम्पुटर्स चं intoduction आणि भारतात आणि भारताबाहेर देखील लाखो जॉब ऑपोर्च्युनीटीज .
तुम्ही जी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजि वापरून सत्तेत आलात ती कोणी आणली होती ?
जेंव्हा तुम्ही सत्तेत आलात,त्या आधी भारत देश हा जगातल्या पहिल्या 10 अर्थव्यवस्थांमधील एक देश होता,
याशिवाय GSLV, मंगळयान, मोनोरेल, मेट्रो रेल, आंतर राष्ट्रीय विमानतळ, पृथ्वी, अग्नी, नाग.

ही प्रक्षेपणास्त्रे, न्यूक्लिअर पाणबुड्या, हे सर्व काही तुम्ही साईटवर येण्यापूर्वी निर्माण केलं गेलेलं होतं,
तेंव्हा कृपया काँग्रेस ने 70 वर्षात काय केलं असले प्रश्न विचारत सभांमध्ये येऊ नका.
त्यापेक्षा कृपया लोकांना तुम्ही साडे पांच वर्षांत कांय क़ाय केलं ते सांगा?
फक्त होत्या त्याच योजनांची नावे बदलणे, पुतळे गगडवणे, गोमातेचे राजकारण, फसलेली नोटबंदी, अतिशय वाईट रीतीने हाताळला गेलेला GST चा प्रश्न, लोकांना तासंतास रांगेत उभं करणं… शेतकऱ्यांच्या वाढलेल्या आत्महत्त्या.

ढोंगी BJP नि FDI ला कडाडून केलेला विरोध आणि आता त्यालाच निर्लज्जपणे केलेला सपोर्ट
अंबानींना भारत विकून टाकणारा बीजेपी आणि HAL ह्या देशाच्या राष्ट्रीय कंपनीला ना देता अनिल अंबानींच्या 2 आठवड्याच्या बाल कंपनीला दिलेलं राफाईल डील ही ठळक उदाहरणं डोळे उघडण्यास पुरेशी ठरावित.
बीजेपी ने पेट्रोल, गॅस, डिझेल च्या किमती टॅक्स लावून वाढवल्या आणि त्या ही अंतर राष्ट्रीय बाजारात त्यांच्या किमती कोसळत असताना.

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या माध्यमातून कमीत कमी धनाराशी बँकेत नाही म्हणून गरिबांकडून दंडाच्या रुपात ओरबाडून घेतलेली ₹ 1771 कोटींची रक्कम!
विकास होतोय तो फक्त अमित शहांच्या मुलाचा, शौर्य डोव्हाल, अंबानी, अदानी ग्रुप आणि बाबा रामदेवांच्या पातंजली उद्योगसमूहाचा, आणि भारतीय जनता पार्टी ला सपोर्ट करणाऱ्यांचा.
3000 कोटी रुपये गंगा नदीच्या सफाईवर खर्च केले गेलेत.
ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी एकदा गंगेत डुबकी मारून पहावी म्हणजे कळेल त्यातला भ्रष्टाचार,
ताजा कलम .
ही काँग्रेस पक्षाची जाहीरात नव्हे, मी काँग्रेस चा समर्थक नाही!
मी फक्त एक सुज्ञ मतदार आहे की ज्याला जेंव्हा जेंव्हा भारताने 70 वर्षात कांय केले असे म्हणून मूर्ख बनवले जाते.
आणि त्याच्या बुद्धिमत्तेचा झोंबणारा अपमान केला जातो कारण हे न कळण्या इतका मी तरी मूर्ख नाही.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

प्रतिनिधी:- डॉ.अब्दुल कलाम यांच्या नंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळवळे असे अधिकारी म्हणजे मा. जावेद अहमद. जावेदसाहेब1980 च्या बॅच चे IPS अधिकारी . केवळ देशसेवा करायची...

READ MORE

ग़ैर-मुस्लिम तहज़ीब वालों की तरफ़ से ईद-उल-अज़्हा को बकरा ईद कहा जा रहा है, क्यों ?

July 11, 2020 . by admin

रिपोर्टर:- कोई ये तो बता दे हमे कि ‘हिन्दोस्तान’ के अलावा पूरी दुनिया की इस्लामिक क़िताबों में इस ईद को ‘बकरा ईद’ कहा गया हो?...

READ MORE

मुसलमान पंचर के साथ बहुत कुछ बनाते हैं, मगर किसी को उल्लू नहीं बनाते,  किसी को कोई शक ?

July 10, 2020 . by admin

रिपोर्टर:- एस एम फ़रीद भारतीय” सबसे पहले देश की धर्म व जातीय एकता की मज़बूती देखी इन की वजह से। दूसरे नम्बर पर देश को...

READ MORE

TWEETS