जास्त पैशांच आमिष दाखवून लोकांची एक कोटीची फसवणूक करणाऱ्या टोळीला पोलिसांनी कसे केले जेरबंद? पाहा सविस्तर बातमी !

IMG-20191003-WA0196

रिपोर्टर:-

फसवणूक करण्याच्या नवनवीन युक्तया शोधून लोकांना हातोहात फसवणाऱ्या चार आरोपींना ठाण्याच्या शीळ डायघर पोलिसांनी अटक केली आहे !

या आरोपींचा फसवण्याचा धंदा असली तरी थोड्या पैशाच्या लोभासाठी ह्या लोकांच्या जाळ्यात फसण्याची चूक काही लोक करत असतात.

कुर्ला मुबंई येथे राहणाऱ्या व लेदरच्या व्यवसाय करणारे निशाद अहमद शेख वय 42 यांना दोन आरोपींनी दिनांक 13/07/2019 रोजी हॉटेल शालू कल्याणफाटा ठाणे येथे बोलावून त्यांना स्वस्त दरात लेदर देतो असे सांगून दोन लाख रुपये रोख घेतले !

त्यातील एक आरोपी पैसे घेऊन पळून गेला तर दुसऱ्या आरोपीला बोगस पोलीस येऊन घेऊन गेले व्यवसायिक निशाद अहमद शेख यांचे पैसे ही गेले व लेदर ही मिळाले नाही, त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले .
त्या बाबत त्यांनी शीळ डायघर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांच्या मार्गदर्शनाखाली शीळ डायघर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व त्यांच्या तपास पथकाने या आरोपींचा शोध सुरु केला असता,
हे आरोपी मोबाईल तंत्रज्ञाना मध्ये हुशार असल्याचे दिसून येत होते प्रत्येकवेळी ते आपले मोबाईल व सिम कार्ड बदलत होते .
त्या मुळे त्यांना पकडणे आव्हानात्मक व जिकरीचे झाले होते.
पण पोलिसांनी मोठ्या कौशल्याने काहीही सुगावा नसताना चार आरोपींना अटक केली.
त्यांची नाव भीमराव मालिकार्जून मालजी उर्फ चेतन मांजिद,उर्फ केतन, उर्फ सोनुसिंग वय 31 राहणार गोवंडी मुबंई हा टीव्ही सीरिअल मध्ये छोट्या मोठ्या भूमिका करत असे!

दुसरा आरोपी प्रविण सुखसागर वर्मा उर्फ कमल उर्फ लल्लू वय 29 राहणार मुंब्रा ठाणे हा गिऱ्हाईक पटवणारा.
तिसरा आरोपी मल्लेश श्रीमंत डिंगी उर्फ मल्लू वय 47 राहणार भिवंडी नकली पोलीस .

चवथा आरोपी चवडाप्पा नरसिंह कालोर वय 38 राहणार भिवंडी सिमकार्ड पुरवणारा.
अशी असून ह्या गुन्ह्यात अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
वरील आरोपी हे आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी पहिले सावज शोधत जसा व्यवसाय तसा फसवणुकीची युक्ती ते शोधून काढत!

चांगली सुशिक्षित व सधन व्यक्ती यांच्या भूलथापांना भुलत असत, त्यासाठी ते शिर्डीच्या मंदिराचा व सिद्धिविनायक ट्रस्टचा हवाला देत !

या देवस्थांनांकडे बरेच पैसे आणि सोन्याचे दागिने पडून असतात!

दानपेटीतल्या पैशांचा आणि दागिन्यांचा हिशोब नसतो तेव्हा ह्यातील शंभर रुपयाच्या नोटा अगणित असतात.
जे कोणी ह्या नोटा घेतील त्याबद्दल दोन हजारांची किंवा पाचशेच्या नोटा देतील त्यांना विस टक्के डिस्काउंट दिले जाईल.
असे खोटे सांगून लोकांना शंभरच्या नोटांचे बंडल दाखवत व सोन्याचे बिस्कीट दाखवत.

ह्यात शंभराची एक नोट वर व एक नोट खाली ठेवून मध्ये कोऱ्या कागदाची बंडल ठेवत व सोन्याचे बनावट बिस्किटे तयार करून ती लोकांना दाखवत .
हे सगळे तुम्हांला स्वस्तात मिळेल याच आमिष दाखवत यांच्या भूलथापांना फसुन व पैशाच्या लोभा साठी यांच्या जाळ्यात फसत.

व्यवहार करताना ते मधेच नकली पोलिसांची रेड पडली असे सांगून तिथून पळ काढत व आपला मोबाईल बंद करून सिम कार्ड फेकून देत असत,
या आरोपींनी अशा प्रकारचे गुन्हे तुर्भे एमआयडीसी येथे दोन,
खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन असे चार गुन्हे व असे सात ते आठ गुन्हे केल्याचे व लोकांची 1 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 10 मोबाईल फोन, फसवणूक केलेल्या रकमेपैकी 28, 000/- रुपये,
फसवणूक करण्याकरिता वापरण्यात आलेल्या नकली नोटा व नकली सोन्याची बिस्किटे असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे,
आरोपींनी वरील अपराध करताना आसाम, मध्यप्रदेश व इतर राज्यातील 253 मोबाईल सिमकार्डचा वापर केला असल्याचे निष्पन्न झाले आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

नई दिल्ली :-  देश का सबसे बड़ा विवादित मसला अयोध्या ,राम जन्मभूमि-बाबरी मस्ज़िद का फैसला अगले महीने की 17 तारीख तक आ सकता हैं। सुप्रीम...

READ MORE

आर्थिक सुस्ती पर RBI के पूर्व गवर्नर आर राजन ने दो टूक में क्या कुछ कह दिया ? जाने !

October 13, 2019 . by admin

रिपोर्टर:- आर्थिक सुस्‍ती पर बोले रघुराम राजन- संकट गंभीर, एक ही व्यक्ति का निर्णय लेना घातक आर्थिक मोर्चे के हर ताजा आंकड़े भारतीय अर्थव्‍यवस्‍था के...

READ MORE

दिल्ली मे किस कदर बुलंद है झपटमारों का आतंक ?पीएम मोदी की भतीजी को भी नही बख्शा !

October 13, 2019 . by admin

रिपोर्टर:- दिल्ली में दिनदहाड़े प्रधानमंत्री के भतीजी का पर्स लूटकर अपराधी हुए फरार नई दिल्ली में सक्रिय अपराधियों के हौंसले इतने बुलंद हैं कि उन्होने...

READ MORE

TWEETS