कशी आणि काय दिली रामदास आठवले यानी शरद पवार याना खुली ऑफर?

रामदास आठवले यांची शरद पवार यांना खुली ऑफर
शरद पवार हे अनुभवी नेते आहे, याचा फायदा एनडीएला होईल. त्यामुळे शरद पवार यांनी युतीत यावे.

बीड: नागालँडमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने नागालँड सरकारला पाठिंबा दिला. त्याचप्रमाणे मोदी सरकारला ही शरद पवार यांनी पाठिंबा देऊन एनडीएमध्ये यावे, असे आवाहन रिपब्लिकन ऑफ इंडिया पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी केले आहे.
पत्रकारांशी बोलताना रामदास आठवले म्हणाले, ‘शरद पवार हे अनुभवी नेते आहे, याचा फायदा एनडीएला होईल. त्यामुळे शरद पवार यांनी युतीत यावे.

नागालँड राज्यामध्ये एनडीएचे सरकार बहुमतात आले आहे. असे असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गरज नसताना पाठिंबा दिला. पण, जसा नागालँडमध्ये पाठिंबा दिला तसा महाराष्ट्र राज्य व केंद्रात शरद पवारांनी पाठिंबा द्यावा.

उस्मानाबादचे धाराशिव तर औरंगाबादचे संभाजीनगर या शहराचे नाव बदलण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांची आहे. ती मागणी केंद्र सरकारने पूर्ण केली आहे. त्या मागणीला आरपीआय पक्षाचा पाठिंबा असून त्याला विरोध करून काय होणार? असेही रामदास आठवले म्हणाले. या दोन्ही शहराच्या नावाला विरोध करण्यासाठी एमआयएम पक्ष आंदोलन करत असून, त्यांचा तो अधिकार आहे, असेही रामदास आठवले म्हणाले.

भारतीय जनता पक्ष व उद्धव ठाकरे यांच्यातील वाद मिटायला हवा. होळीच्या दिवशी दे

वेंद्र फडणवीस जे बोलले आहेत तसे त्यांनी पुढाकार घ्यायला हवा. पण उद्धव ठाकरे वाद मिटवतील, असे वाटत नाही. त्यांनी वाद मिटवला आणि परत आले तर ते एकनाथ शिंदे मुख्यमंत्री नको म्हणतील. त्यामुळे उद्धव ठाकरे वाद मिटवतील असे वाटत नाही, असेही रामदास आठवले म्हणाले.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

पाकिस्तानी मीडिया ने की पीएम मोदी की जमकर तारीफ, कहा- भले नफरत करें लेकिन पाकिस्तान के एक प्रमुख अखबार ने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की जमकर...

READ MORE

कांग्रेस द्वारा मोदी जी से पूछे गए वह क्या है पांच प्रश्न और उनके जवाब का विवरण ? खुलासा जानिए

December 23, 2022 . by admin

चीनी घुसपैठ पर, प्रधानमंत्री मोदी से पांच सवाल 17 दिसंबर, 2022 को लोकसभा में कांग्रेस ने प्रधानमंत्री से चीन पर 7 प्रश्न पूछे थे, पर...

READ MORE

अगले 90दिनों में चीन की 60%से ज्यदा आबादी होगी संक्रमित लाखों लोग काल के गाल में समा जायेंगे,मचेगी तबाही?

December 21, 2022 . by admin

आगामी 90 दिनों में चीन की 60% से अधिक आबादी संक्रमित होगी COVID-19 प्रतिबंधों में ढील के बाद, चीन कोरोनोवायरस मामलों में भारी वृद्धि का...

READ MORE

TWEETS