इंजीनियर्स विद्यार्थी साठीकाय आहे खास बातमी?

download (32)

मुंबई, 12 मार्च : इंजिनिअर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (engineering students) एक मोठी बातमी आहे.

इंजिनिअरिंगला प्रवेश घेण्यासाठी गणित (Maths) आणि भौतिकशास्त्र (Physics) हे दोन विषय बारावीला आवश्यक नाहीत,असा महत्त्वपूर्ण निर्णय ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन (All India Council for Technical Education ) या संस्थेने घेतला आहे.
या निर्णयाचा पुढील शैक्षणिक वर्षात मोठा परिणाम होणार आहे.
इजिंनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी गणित आणि भौतिकशास्त्र हे दोन विषय गाभा समजले जातात.
मात्र 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी AICTE संस्थेने या नियमांमध्ये बदल केले आहेत.

आता संस्थेने 14 विषयांची यादी जाहीर केली असून यापैकी कोणत्याही तीन विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी किमान 45 टक्के मार्कांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
वेगवेगळ्या विषयांची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांनाही इंजिनिअर होता यावे म्हणून संस्थेने हा निर्णय घेतला आहे.

कोणत्या 14 विषयांचा समावेश?

AICTE ने 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, कॉम्पुटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलजी, जीवशास्त्र, इन्फॉर्मेशन प्रॅक्टिस, बायोटेक्नॉलजी, टेक्निकल व्होकेशनल सब्जेक्ट, इंजिनिअरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आणि उद्योजकता (entrepreneurship) या विषयांचा समावेश आहे.

निर्णयाचे जोरदार पडसाद !

लाखो विद्यार्थ्याांच्या भविष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या या निर्णयाचे पडसाद आता उमटण्यास सुरुवात झाली आहे.
‘गणित हा विषय इजिंनियरिंगच्या सर्व विषयांचा पाया आहे.
इंजिनियरिंग कॉलेजमधील प्रगत अभ्यासक्रम समजण्यासाठी गणितचा पाया भक्कम असणे आवश्यक आहे,असे मत शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

AICTE च्या अभ्यासक्रमानुसार इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पाचव्या सत्रापर्यंत (Semester) गणित हा विषय आहे.
त्यामुळे बारावीला देखील हा विषय हवा, असे तज्ज्ञांनी म्हंटले आहे.

AICTE संस्थेचे संचालक डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी या विषयावर स्पष्टीकरण दिले आहे. ‘
इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आवश्यक अशा तीन विषयांच्या यादीचा विस्तार करण्यात आला आहे.
त्यामुळे वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांसाठी तीन वेगळे आवश्यक विषय असतील,
असे त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ शी बोलताना स्पष्ट केले आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

फडणवीस, पेगासस झारी के शुक्राचार्य मंत्रालय के उन 5अधिकारी यो का इसराइली दौरा क्या कहलाता है? 2019 अक्तूबर में हुए विधानसभा चुनाव के बाद नोव्हेंबर...

READ MORE

इस साल का सब से महंगा बकरा, दोनो बकरों की कीमत जान कर आप हों जायेंगे हैरान ?

July 20, 2021 . by admin

रिपोर्टर:- कल बकरीद का त्योहार है चौक में बंधे पर बकरा मंडी लगाई गई। हज़ारों की तादाद में कुर्बानी के मद्दे नजर बकरा मंडी में...

READ MORE

मुंबई के डोंगरी इलाके में उध की लकडी तस्करी करने वाले को मुंबई क्राइम ब्रांच unit-1 ने रंगे हाथ धर दबोचा?

July 20, 2021 . by admin

रिपोर्टर:- साउथ मुंबई में मुंबई क्राइम ब्रांच ने उध की लकड़ी के आरोपियों को तस्करी करते हुए रंगे हाथ धर दबोचा। मुंबई क्राइम ब्रांच की...

READ MORE

TWEETS