आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात पलायन करणाऱ्या आमदारा विरुद्ध शरद पवार क़ाय बोलले ? ते सविस्तर पाहा ! 

images (12)

पुणे :-

कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे, पक्ष सोडणाऱ्या नेत्यांवर शरद पवारांची प्रतिक्रिया.

राष्ट्रवादीला लागलेल्या गळतीवर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
पक्षाने अशी परिस्थिती पहिल्यांदाच पाहिलेली नाही, यापूर्वीही अशी परिस्थिती आली होती.
पण या परिस्थितीला कसं उत्तर द्यायचं ते आम्हाला ठाऊक आहे,त्यामुळे कसलीही भीती नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

आमदारांच्या पळवापळवीवर शरद पवार म्हणाले, माझ्या दृष्टीने सध्या काही घडत नाही!
केंद्र आणि राज्यात सत्ता असल्याशिवाय आपलं निवडून येणं शक्य नाही, अशी भीती मनात असणारा वर्गच अस्वस्थ आणि अस्थिर झालाय.

तर दुसरीकडे हातात सत्ता आहे ते सत्तेचा गैरवापर करुन अनेकांना ओढून घेत आहेत, असं म्हणत शरद पवारांनी भाजपवरही निशाणा साधलाय.
आयकर विभागाची आणि ईडीची भीती दाखवली जात असल्याचं आमच्या काही नेत्यांनी मला सांगितलं.
याचं उदाहरण कोल्हापुरात दिसलं.

ते (हसन मुश्रीफ) भाजपात येणार नाही म्हणताच त्यांच्यावर आयकर विभागाच्या धाडी टाकण्यात आल्या.
सत्तेचा गैरवापर सुरु असल्याचं आपल्यासमोर आहे, असंही शरद पवार म्हणाले.
पक्षाचं म्हणायचं तर मला याची थोडीही चिंता वाटत नाही. 1980 मध्ये आमचे 60 लोक निवडून आले.
मी 15 दिवस परदेशात होतो, त्यादरम्यान आमचे सर्व लोक फोडले.

मी देशात परतलो तेव्हा आमच्याकडे फक्त 6 आमदार शिल्लक होते. पण तेव्हाही मला चिंता नव्हती.
कारण त्यानंतरच्या निवडणुकीत जे आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले आणि पुन्हा आमचे 60 आमदार निवडून आले.

त्यामुळे हे सर्व आम्ही अनुभवलंय, त्याला कसं उत्तर द्यायचं हे ही आम्हाला ठाऊक आहे.
आणि पुन्हा पक्ष कसा उभा करायचा याचीही आम्हाला काळजी आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

प्रतिनिधी:- डॉ.अब्दुल कलाम यांच्या नंतर ज्यांनी अंत:करणात स्थान मिळवळे असे अधिकारी म्हणजे मा. जावेद अहमद. जावेदसाहेब1980 च्या बॅच चे IPS अधिकारी . केवळ देशसेवा करायची...

READ MORE

ग़ैर-मुस्लिम तहज़ीब वालों की तरफ़ से ईद-उल-अज़्हा को बकरा ईद कहा जा रहा है, क्यों ?

July 11, 2020 . by admin

रिपोर्टर:- कोई ये तो बता दे हमे कि ‘हिन्दोस्तान’ के अलावा पूरी दुनिया की इस्लामिक क़िताबों में इस ईद को ‘बकरा ईद’ कहा गया हो?...

READ MORE

मुसलमान पंचर के साथ बहुत कुछ बनाते हैं, मगर किसी को उल्लू नहीं बनाते,  किसी को कोई शक ?

July 10, 2020 . by admin

रिपोर्टर:- एस एम फ़रीद भारतीय” सबसे पहले देश की धर्म व जातीय एकता की मज़बूती देखी इन की वजह से। दूसरे नम्बर पर देश को...

READ MORE

TWEETS