आता आयडिया-व्होडाफोन, एअरटेलची कम्पनी पण संकटात, तर मग ग्राहक पण बेज़ार , यावर तोड़गा क़ाय ?

USSD-Codes-List-2

प्रतिनिधी:-

तिन्ही कम्पनी ची सेवा महागणार
१ डिसेंबरपासून नवीन दर होणार लागू .
टेलिकॉममधील संकटाचा परिणाम आता सामान्य ग्राहकांवर होणार आहे.
देशातील टेलिकॉम कंपनी आयडिया, व्होडाफोन, एअरटेलने १ डिसेंबरपासून त्यांच्या टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
नजीकच्या काळात ३० ते ४५ टक्के दरवाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
सरकार टेलिकॉम कंपन्यांकडून एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू (एजीआर) वसूल करते.

कंपन्यांच्या एडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू प्रलंबित असलेल्या प्रचंड मोठ्या थकबाकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
परंतु, या दोन्ही कंपन्यांनी अद्याप त्यांच्या निर्णयाचा सर्वसामान्यांच्या खिशावर किती परिणाम होणार आहे याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही.
कठीण आर्थिक परिस्थितीतून जात असलेल्या व्होडाफोन-आयडिया, एअरटेलने त्यांचं शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे ग्राहकांना फोन कॉल, एसएमएस आणि इंटरनेट डेटासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत.
वोडाफोन आयडिया लिमिटेडने, १ डिसेंबरपासून योग्यरित्या दरात वाढ करणार असल्याचं सांगितलं.
डबघाईला आलेल्या व्होडफोन आणि एअरटेल दोन्ही कंपन्याना मिळून गेल्या तिमाहीत ७४ हजार कोटींचा तोटा झाला आहे.

दोन्ही कंपन्यांची मिळून ग्राहक संख्या ८० कोटींच्या घरात आहे.
पुढील दोन वर्षात सध्याच्या दराच्या तीनपट बिल भरावं लागेल,
अशी शक्यता टेलिकॉम इंडस्ट्रतील तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे.
सरकारने टेलिकॉम कंपन्याना पॅकेज द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.
त्यावर सरकार सहानुभूतीने विचार करत असल्याचे संकेत अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दोन दिवसापूर्वी दिले आहेत.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT

रिपोर्टर:- पुलिस को अम्बेडकर पर शोध करने कीं सलाह दी गई कामिनी लाॅ, सेशन जज, के ज़रिए। कहा ये अम्बेडकर और संविधान का युग है।...

READ MORE

निर्भया रेप कांड के दोषियों के विरुद्ध 22 जनवरी नही बल्कि नया डेथ वारेंट जारी, 1 फ़रवरी को, होगी फांसी ? मची खलबली !

January 18, 2020 . by admin

रिपोर्टर:- निर्भया गैंगरेप मामले में दिल्ली की अदालत ने सभी चारों दोषियों के खिलाफ नया डेथ वारेंट जारी कर दिया है। इस नए डेथ वारेंट...

READ MORE

6 साल की मासूम के साथ दुष्कर्म कर की हत्या ,क्रूर अभियुक्त को हुई फांसी की सजा !

January 18, 2020 . by admin

रिपोर्टर:- 6 साल की मासूम के साथ दुष्कर्म कर हत्या करने वाले क्रूर अभियुक्त को फास्ट ट्रैक कोर्ट ने सुनाई फांसी की सजा। राजधानी के...

READ MORE

TWEETS