५० हजाराची लाच मागितल्याप्रकरणी एसीबीच्याच पोलिस उपअधिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल !

IMG-20170812-WA0038

प्रतिनिधि.

मुंबई येथील पथकाची लातूर येथे कारवाई !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या मुंबई येथील पथकाने शुक्रवारी रात्री उशिरा लातुर लाचलुचपत विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला.

चौकशीनंतर डीवायएसपी सुरेश शेटकर यांच्यावर मध्यस्थामार्फत पन्नास हजाराची लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका प्रकरणात कारवाई न करण्यासाठी येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सुरेश शेटकर यांनी एका मध्यस्था मार्फत पन्नास हजाराची लाच मागितल्याची तक्रार लातूर येथील एकाने मुंबई येथील कार्यालयात केली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने मुंबई येथील पथकाने लातुर येथे येवून शुक्रवारी रात्री येथील लाचलुचपत विभागाच्या कार्यालयावर छापा टाकला. ही कारवाई शनिवारी सकाळपर्यंत सुरू होती.

दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नांदेड यांच्या मार्गदर्शना खाली पोलिस उपाधिक्षक शेटकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, मध्यस्थ छोटू गडकरी याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT