मुंबईत भोइवाडा पोलीस ठाणे अंतर्गत मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर धंद्याना उधाण ?वरिष्ठ पोलीस अधिकारी झालाय बेभान बेकायदेशीर धंदेचालकाना देतोय अभयदान ?

IMG-20171110-WA0128

मुंबई:- प्रतिनिधि.

मुंबईतिल भोइवाडा पोलिस ठाणे सध्या फार चर्चेत आहे,त्याला कारण हि तसेच आहे. या पोलिस ठाणे अंतर्गत विस ते पंचवीस झटपट लॉटरी ची बेकायदेशीर अवैध दुकाने,चार मटका जुगार,पाच क्लब,आणि तिन बेकायदेशीर चद्दर पलटि चे लॉज ,तसेच इतर हि बरेच काहि बेकायदेशीर धंदे बेदिक्कतपने खुलेआम चालू आहेत !

या माध्यमातून या पोलिस ठाणे चे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला किती काळी कमाई मिळत असेल याचि कल्पना करणे कठीण आहे ?

याच बेकायदेशीर धंद्याची जर एखाद्या दक्ष नागरिक,अथवा पत्रकार यांनी तक्रार केलि तर मग या वरिष्ठ पोलिस अधिकारीचे रक्त खवळून उठते ?

आणि हे महाशय एक तथाकथित लॉटरी अध्यक्ष याला तक्रारदार बनवतात आणि त्या पत्रकाराला तूम्ही खोटे पत्रकार आहात अशि नोटीस पाठवून त्याला घाबरवण्याकरिता,भय व दहशत दखविने करता पोलिस ठाण्यात विचारपुस करणे सांठी बोलाविले जाते, असे दोन पत्रकार यांना मागील सप्ताह मध्ये नोटीस दिल्या आहे असे समजते , म्हणजे यांच्या बेकायदेशीर धंद्याच्या तक्रारी केल्यास हे पोलीस अधिकारी आपल्या पदाचा दुरूपयोग करुन त्या तक्रारदारान्ना घाबरवतात !

या महाभ्रष्ट पोलिस अधिकारी यांच्या या उद्दामतेची माज महाराष्ट्र एकता पत्रकार संघाच्या वतीने उतरून टाकल्या शिवाय गप्प बसणार नाही असे अध्यक्ष मनोज म्हात्रे यांनी संगीतले !

तसेच या भ्रष्टाचारि वरिष्ठ पोलीस अधिकारी याचि तक्रार महाराष्ट्रराज्याचे मुख्यमंत्री,राज्यपाल,पोलिस महासंचालक,अध्यक्ष मानवअधिकार आयोग,तसेच पोलिस आयुक्त मुंबई यांना करण्यात येनार आहे असे मीडिया डीटेक्शन न्यूज़ टीम ला सविस्तर बातमी दिली गेलीआहे!

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT