प्रिय मुंबईकरांनो, ही श्रद्धांजली वाहणार का?

IMG_20171002_124519

प्रतिनिधि.

एल्फिस्टन रोड स्टेशनला 2 डझनभर रेल्वे प्रवासी किडा मुंगीसारखे मारले गेले !
आपण त्यात समाविष्ट नव्हतात म्हणून देवाचे आभार मानत हा मेसेज वाचत आहात.

करोडो रुपये उधळून आवश्यकता नसताना सुद्धा मुंबई – अहमदाबाद (मुंबई दिल्ली पण नाही) बुलेट ट्रेनचा राजहट्ट एकीकडे आणि दुसरीकडे रोज ट्रेनमध्ये लटकून प्रवास करणारे लाखो पुरुष व महिला प्रवासी.
मित्रांनो, तुमची परवा कोणालाच पडलेली नाही.

अशावेळी बुलेट ट्रेनने ढगात प्रवास करणाऱ्या राज्यकर्त्यांना जमीनपर आणायची वेळ झाली आहे!
तर आता चला आपण सगळे *शांतपणे* आवाज उठवूया।

सोमवारी बरीच कार्यालये सुरू आहेत वा नसतीलही.
या मृतात्म्या ना श्रद्धांजली म्हणून सोमवारी महात्मा गांधी जयंती दिनी गांधीजींच्या मार्गाने आंदोलन करूया.

दसऱ्याचे ९ दिवस नवरंग साड्यांची कल्पना महिलावर्गाने राबवली.
तसाच हा सोमवार – काळा रंग, झोपलेल्या सरकारला श्रद्धांजली देवून जागवुया ।
सर्व पुरुष-महिला, सर्व जातीधर्माच्या समस्त मुंबईकरांना जाहीर आवाहन।

एल्फिस्टन रोड रेल्वे दुर्घटना मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी 2 ऑक्टोबर – काळा सोमवार पाळूया।
झोपलेल्या सरकारचा निषेध म्हणून रेल्वेचा प्रत्येक प्रवासी सोमवारी काळ्या रंगात रंगेल आणि गांधीजींच्या अहिंसेच्या मार्गाने शांतपणे आपला राग व आक्रोश व्यक्त करेल.

दोन दिवसात संकल्प करा व हा मेसेज होऊ दे मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ, विरार, डहाणू पर्यंत व्हायरल.  बंधू-भगिनींनो, हे कराल ना ?

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT