प्रतीक सप्ताह दोन दिवस लोक डाउन एसेल पणपरीक्षार्थी, वाहनचालकांना आणि अन्य लोकाना निर्बंधातून सूट ?

images – 2021-04-06T231310.176

मुंबई:-रिपोर्टर.
करोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने कठोर निर्बंध लागू केले असले तरी काही घटकांना सूट देण्यात आली आहे.
घरकाम करणारे, स्वयंपाकी, परीक्षार्थी, वाहन चालकांना रात्री ८ नंतर तसेच शनिवार व रविवार संपूर्ण टाळेबंदीच्या काळात ये-जा करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
तसेच रात्रीच्या वेळी रेल्वे, विमान प्रवासास मुभा देण्यात आली आहे.

राज्य सरकारच्या वतीने सोमवारी रात्री नवा आदेश लागू करण्यात आली.
घरकाम करणारे, स्वयंपाकी, कामगार, वाहनचालक यांना सूट देण्याची मागणी करण्यात आली होती.
यानुसार या सर्व वर्गाना सवलत देण्यात आली आहे.
रात्री ८ नंतर संचारबंदीच्या काळात तसेच शनिवार आणि रविवारी संपूर्ण टाळेबंदीच्या काळात कामगार, स्वयंपाकी, घरकाम करणारे यांना ये-जा करता येईल.

यासाठी परिस्थितीनीरुप निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आले आहे.
खासगी कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांना त्यांच्या ओळखपत्राच्या आधारे रात्री ८ नंतर तसेच शनिवार व रविवार खासगी बसेस किंवा खासगी वाहनांमधून प्रवास करता येईल.
रेल्वे, बस किंवा विमानाने रात्री ८ नंतर आगमन होणाऱ्या किंवा शनिवार व रविवारी येणाऱ्या प्रवाशांना घरी जाता येईल.
यासाठी प्रवासाचे तिकीट त्यांच्याबरोबर असणे बंधनकारक असेल.
या निर्णयामुळे रात्री उशिरा येणाऱ्यांना स्थानकांवर तत राहावे लागणार नाही.

परीक्षा देणाऱ्या विद्याथ्र्यानाही रात्री ८ नंतर व शनिवार व रविवारच्या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
यासाठी परीक्षेचे हॉल तिकीट बाळगणे आवश्यक असेल.
धार्मिकस्थळे बंद असली तरी विवाह किंवा अंत्यसंस्कारासाठी परवानगी दिली जाईल.
विवाह समारंभ शनिवारी किंवा रविवारी असल्यास नियमांचे पालन करण्याच्या अटीवर परवानगी दिली.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT