पुढील 2024 साल च्या निवडणुकीत कोंग्रेस साठी पंतप्रधान कोण ?

images (29)

रिपोर्टर:-

2024 सालच्या निवडणुकांची तयारी भाजपने आधीपासून सुरू केली आहे.
देशात सक्षम विरोधी पक्ष असणे आवश्यक आहे.
त्यामुळे काँग्रेसने आपला पंतप्रधानपदाचा उमेदवार योग्यवेळी ठरवला पाहिजे.

2014 साली मोदी पंतप्रधान झाले, पण त्या अगोदरच्या वर्षात भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून त्यांची निवड केली होती.
काँग्रेसला जर घराण्याबाहेरची व्यक्ती पंतप्रधान म्हणून हवी असेल,
तर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल हे एक नाव विचारात घेता येऊ शकेल.
बघेल हे पाच वेळा निवडणूक जिंकले आहेत .
आणि दिग्विजयसिंग यांच्या मंत्रिमंडळातही ते मंत्री राहिले होते.

मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी उत्तम कामगिरी केली आहे.
धानाच्या किमतीत 50 टक्के वाढ करणे, शेतकऱ्यांची कर्जमाफी यशस्वीपणे राबवणे, शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करणे वगैरे कामे त्यांच्या नावावर जमा आहेत.
मतदार काँग्रेसकडे कितपत आशेने बघतो, हे माहिती नाही. पण भूपेश यांच्याकडे मात्र तो अपरिहार्यपणे ‘बघेल’!

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT