खुनाच्या गुन्ह्याखाली पोलीस निरीक्षकांसह 3 जणांना अटक, एक जण फरार ? सविस्तर बात्मी !

download – 2021-05-29T233409.542

गोंदिया :
जालना जिल्ह्यात भा.ज.पा. कार्यकर्त्याला बेदम मारहाण करण्याची घटना ताजी असताना गोंदियामध्ये आमगाव पोलीस कोठडीत आरोपी मृत्यू प्रकरणी पोलीस निरीक्षकांसह पोलिसांना भा.द.वी. कलम 302 खाली अटक करण्यात आली आहे.
तर एक पोलीस उपनिरीक्षक अटकेच्या भीतीने फरार आहे.
पोलिसांवर खूनाचा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे.

त्यामुळे पोलीस प्रशासनात उडाली खळबळ .
गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पोलीस स्टेशन अंतर्गत कुंभारटोली येथील अनेक गुन्ह्या प्रकरणी राजकुमार अभयकुमार धोती याला अटक करण्यात आली होती.
आमगाव कोठडीत पोलिसांनी राजकुमारला बेदम मारहाण केली होती.

त्यामुळे पोलीस कोठडीत त्याचा मृत्यू झाला होता.
। या प्रकरणाचा तपास सी.आय.डी.कडे देण्यात आला होता.
पोलिसांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचे सी.आय.डी.त तपासात सिद्ध झाले होते.
या प्रकरणात तपासाअंती पोलीस प्रशासनातील पोलीस निरीक्षक सह पाच पोलीसांवर खुनाचा गुन्हा  दाखल करण्यात आले आहे.

एकाचवेळी पाच पोलिसांवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे.
सदर प्रकरणात आरोपी  पोलीस निरीक्षक सुभाष चौहान , सहायक पोलीस निरीक्षक महावीर जाधव,
पोलीस हवालदार खेमराज खोब्रागडे, अरुण उके, दत्तातय कांबळे यांच्याविरोधात भा.द.वी. कलम 302 ,330,34 अंतर्गत गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली.

यात पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव पसार असून त्याला अटक करण्यात आले नाही.
पोलिस आरोपींना मे.न्यायालयात हजर करण्यात आले असून २ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT