केवळ 5 वी पास पत्रकार कसा ? उस्मानाबादच्या पत्रकारितेला कलंक !

images (86)

मेहमूद शेख .

उस्मानाबादच्या इंदिरानगरचा बोगस आणि भंपक पत्रकार अमजद सय्यद याचा पाण्याचा बुडबुडा अखेर फुटला आहे.
केवळ पाचवी नापास असणारा हा भामटा कोणत्याही वृत्तपत्र आणि पेपरचा अधिकृत पत्रकार नव्हता पण तो पत्रकार असल्याचे भासवत होेता.
केबल जोडणीचे काम करणार्‍या स्त्रीलंपट या भामट्याचे दारू आणि मटक्याच्या गोरखधंद्यातही भागिदारी होती,असे आढळून आले आहे.

या भामट्याने बुुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शहरातील भीमनगरमधील एका तरूणीस दारूच्या नशेत तर्रर होवून फोन केला आणि शरीरसुखाची मागणी केली.
सदर मुलीने नकार देताच तिला अश्‍लिल आणि जातीवाचक शिविगाळ केली,इतकेच काय तर पत्रकारितेचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिली.

अश्या किती मुलींना जाळयात ओढण्याचे काम हा भामटा करीत होता,याचा तपास होणे आवश्यक आहे.
सदर पीडित तरूणीच्या तक्रारीवरून शहर पोलीसांनी भादंवि 354, 354 (ड), 504,507,509 आणि अ‍ॅट्रोसिटी अ‍ॅक्ट नुसार गुन्हा दाखल केल्यामुळे या भामट्याचे बिंग फुटले आहे.

न्यायालयाने या भामट्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्यामुळे पोलीसांच्या पुढील तपासाला गती येणार आहे.
या बोगस आणि भंपक पत्रकाराने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.
इंदिरानगरमधीलच सुरज क्षीरसागर या तरूणास दोन वर्षापुर्वी खोट्या गुन्ह्यात अडकावले होते.
तसेच त्याच्या कुटुंबाचा अन्ववित छळ केला होता,त्यामुळे सदर तरूणाने जेलमध्ये असताना हाताची नस कापली होती.

या प्रकरणी या बोगस पत्रकाराविरूध्द आनंदनगर पोलीस ठाण्यात ऑगस्ट 2016 मध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल झाला होता,त्याची बातमी दैनिक गावकरीने देताच,या बोगस पत्रकाराने काही दारू विक्रेत्या महिलांना पुढे करून 6 सप्टेंबर 2016 रोजी मध्यवस्तीत असलेल्या असलेल्या समतानगरमधील गावकरी कार्यालयावर हल्ला केला,
इतकेच काय तर प्रामाणिक आणि निर्भीड पत्रकार सुनील ढेपे,तसेच गावकरी कर्मचारी सुधीर पवार आणि अजित तांबोळी यांच्याविरूध्द एका महिलेला पुढे करून खोटा गुन्हा दाखल केला.

गावकरी हल्लामध्ये या बोगस पत्रकाराचा मुख्य सहभाग होता,त्याच्यासह तीन महिला आणि एक पुरूष अश्या पाच जणांविरूध्द मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात सध्या दोषारोप पत्र दाखल आहे.

गतवर्षी 5 सप्टेंबर 2016 रोजी विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन झाले होते,त्याच्या दुसर्‍या दिवशी गावकरी कार्यालयावर हल्ला करण्यात आला होता.
यंदाच्या गणेशोत्सवातच या बोगस आणि भंपक पत्रकारावर गंभीर गुन्हा दाखल झालेला आहे.

हा योगायोग म्हणावा की त्याच्या कर्माचे फळ म्हणावे असा प्रश्‍न तमाम उस्मानाबादकरांना पडला आहे.
विघ्नहर्त्या गणरायाने त्याला त्याच्या पापाची शिक्षा दिलेली आहे,असे प्रतिक्रिया शहरात उमटल्या आहेत.

हा बोगस आणि भंपक पत्रकार उस्मानाबादेतील काही मोजक्या पत्रकारांमध्ये ऊठबस करीत होता,लोकल केबलवर स्क्रोल न्यूज देवून चॅनलचा मालक असल्याचे सांगत होता.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याची कोणतीही मान्यता नसताना त्याने हा उद्योग केला होता.या लोकल केबलवर त्याने अनेकांची बदनामी केल्याची माहिती आहे.

त्याचबरोबर त्याच्या फेसबुक वॉल आणि व्हॉटस् अ‍ॅप गु्रपही अनेकांविरूध्द अश्‍लिल आणि घाणेरडे लिखाण करून नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता.
घाणीत कोण दगड टाकावा म्हणूून अनेकजण गप्प होते,अखेेर त्याच्या पापाचा घडा आपोआप भरला आहे.
या बोगस पत्रकारांने मान्यता नसलेल्या लोकल केबल चॅनलवर आणि फेसबुक आणि व्हॉटस् अ‍ॅपवर काय बदनामी केली,त्याचा तपास होणे आवश्यक आहे.
त्याचबरोबर त्याचे मटका आणि दारूच्या व्यवसायात कोणाकोणाशी संबंध आहेत,हेही उघड होणे गरजेचे आहे.

भीमनगरच्या पीडीत तरूणीला याने पत्रकारितेेचा धाक दाखवून जसे फोन केले तसेच याने अजून कोणत्या मुलीला फोेन करून त्रास दिला,लैंगिक छळ केला,याचा तपास होणे आवश्यक आहे.

पत्रकार असल्याचे भासवून याने मागील दोन वर्षापुर्वी उस्मानाबाद शहरात दर रविवारी भरणार्‍या आठवडी बाजाराच्या कर वसुलीचे टेंडरही घेतले होते.

नियमानुसार 10 रूपये घेण्याऐवजी हा शेतकर्‍यांकडून 30 ते 50 रूपये वसूल करीत होता.30 ते 50 रूपये न दिल्यास शेतकर्‍यांचे भाजीपालाचे गठुडे रत्यावर फेकण्याचे काम त्याचे गुंड करीत होते.
त्याच्या बातम्या दिव्य मराठी आणि उस्मानाबाद लाइव्हने प्रकाशित केल्या होत्या.अखेर नगर पालिकेने त्याचा ठेका बंद केला होता.

शहरातील इंदिरानगरमध्ये जी अवैध दारू विक्री होते त्यात तो भागिदार असल्याचा पुरावा पोलीस विभागाला मिळाला आहे.
त्याचा एक नातेवाईक मटक्याचे बुक्की घेतो.त्याच्यातही त्याचा सहभाग आहे.

त्याचे गुन्हेगाराची असलेले संबंध उघड होणे आवश्यक आहे.मागील पोलीस निरीक्षकांने याचे लाड पुरवले होते.त्यामुळे त्याची मस्ती वाढली होती.

मटका आणि दारूच्या व्यवसायामध्ये अप्रत्यक्ष संबंध असताना हा बोगस आणि भंपक पत्रकार पोलीसांच्या विरूध्द सोशल मीडियावर खोट्या बातम्या पसरावत होता.
चार ओळी नीट लिहिण्याची अक्कल नसताना हा वाटेल ते काहीही लिहित होता.

वास्तविक शहर आणि आनंदनगर पोलीस स्टेशनला आलेल्या नविन पोलीस निरीक्षकांनी मटका आणि दारू धंदे बंद केले आहेत.

पोलीस अधीक्षकांनी स्वतः लक्ष घालून अवैध धंदे आटोक्यात आणले आहेत.
केवळ संबंध असलेल्या दारू आणि मटका वाल्यांना पकडले म्हणून हा पोलीसांवर खोटा आरोप करीत सुटला होता.त्याच्या काही पोस्ट व्हॉटस् अ‍ॅपवर व्हायरल झाल्या होत्या.

अमजद सय्यद हा कोणत्याही चॅनल आणि वृत्तपत्राचा पत्रकार नसताना शहरातील काही पत्रकारांनी याला का जवळ केले होते हा संशोधनाचा विषय आहे.याच्यामुळे उस्मानाबादच्या पत्रकाराची प्रतिमा मलिन झाली होती.पत्रकारही दोन नंबरचे धंदे करतात असा उघड आरोप केला जात होता.

याला खड्यासारखे तेव्हाच बाजूला ठेवले असते तर उस्मानाबादच्या पत्रकारांना आज खाली बघण्याची वेळ आली नसती.

हा भंपक आणि बोगस पत्रकार मराठी पत्रकार परिषदेच्या उस्मानाबाद शाखेचा जिल्हा संघटक म्हणून सांगत होता
.मागे त्याचे होर्डींगही झळकले होते.मराठी पत्रकार संघाच्या कार्यक्रमात तो प्रत्येक फोटोत दिसतो आहे
.तो संघटक असेल तर त्याची तात्काळ हकालपट्टी होणे आवश्यक आहे.

पत्रकारांनी आता हा धडा घेवून त्याला खड्डयासाखरे दूर फेकले पाहिजे . तरच पत्रकारांची प्रमिमा उजाळेल अन्यथा त्यांनाही या बोगस आणि भपंकामुळे कलंकित व्हावे लागेल!

 

SHARE THIS

RELATED ARTICLES

LEAVE COMMENT